25 May 2020

News Flash

‘लोकसत्ता वर्षवेध’ला विद्यार्थ्यांची पसंती

संपूर्ण वर्षांवर दृष्टिक्षेप टाकणारा हा एक संग्राह्य़ अंक आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

सनदी सेवेसह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाटाडय़ा म्हणून ओळख बनलेला तसेच संशोधक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करणाऱ्यांसोबत वर्षभरात जगभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे कुतूहल असणाऱ्यांना उपयुक्त ‘लोकसत्ता वर्षवेध-२०१९’ला उदंड प्रतिसाद मिळत आहे. प्रकाशनानंतर गेल्या महिनाभरामध्ये जिज्ञासूंना या अंकाने मोठय़ा प्रमाणावर आकर्षित केले आहे.

वर्तमानाकडे उघडय़ा डोळ्यांनी पाहू इच्छिणाऱ्या सुजाण आणि सजग नागरिकांना गतवर्षांतील ठळक नोंदींचे भांडार ‘लोकसत्ता वर्षवेध’द्वारे उपलब्ध करून देण्यात येते. पहिल्या अंकापासून ‘वर्षवेध’कडे संदर्भमूल्य म्हणून पाहिले गेले. नेहमीप्रमाणेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पटलावर घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत त्यांचे व्यापक पातळीवर विश्लेषण या अंकामध्ये आहे. सरकार आणि न्यायालयीन पातळीवर घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय आणि त्यांचे पडसाद यांवर यात सटीप माहिती देण्यात आली आहे. भारतीय क्रीडापटूंनी वर्षभरात जगभरात केलेली कामगिरी, लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदललेली राजकीय परिमाणे, मनोरंजन क्षेत्रात आलेली चरित्र सिनेमांची लाट याशिवाय साहित्य, पर्यावरण, समाजकारण आदी क्षेत्रांत घडलेल्या लक्षवेधी गोष्टींचा तपशील यात आहे. संपूर्ण वर्षांवर दृष्टिक्षेप टाकणारा हा एक संग्राह्य़ अंक आहे.

मी एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा विषय अतिशय महत्त्वाचा असतो. त्याची तयारी करण्यासाठी हुकमी साहित्य म्हणजे ‘लोकसत्ता वर्षवेध’ हा विशेषांक. वर्षभरातील घडामोडींची मुद्देसूद माहिती मिळते. त्यामुळे ‘लोकसत्ता वर्षवेध’ मला अतिशय आवडते. आमच्या मित्रांच्या वर्तुळातही या विशेषांकातील मुद्दय़ांवर आणि त्यातील माहितीवर कायम चर्चा होते. रोजचा ‘लोकसत्ता’ तर वाचतोच पण ‘वर्षवेध’ही आवडीने वाचतो.

शैलेश नितुरे, उस्मानाबाद

माझी तहसिलदारपदासाठी निवड झाली असून त्यासाठीचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. ‘लोकसत्ता वर्षवेध’ मात्र मी नेहमीच घेत असतो. परीक्षा देत असताना तर त्याचा अतिशय उपयोग होत असे. वर्षभरातील महाराष्ट्राशी संबंधित घडामोडींची पटकन माहिती मिळण्यासाठी ‘वर्षवेध’ उपयोगी पडतो. परंतु माझी अशी विनंती आहे की, ‘वर्षवेध’मध्ये मुद्दय़ांच्या स्वरूपात माहिती दिली जाते. हे मुद्दे थोडे अधिक विशद करून सांगितले तर आम्हा विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होईल. त्याचसोबत महत्त्वाच्या विषयांवरील लेखांचे प्रमाण वाढवले तर त्याचाही नक्कीच उपयोग होईल.

जितेंद्र शिकतोडे, मंगळवेढा

केवळ स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर सर्वच व्यक्तींसाठी ‘लोकसत्ता वर्षवेध’ महत्त्वाचा आहे. गेल्या वर्षभरात आपल्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रात काय घडले, ते सांगण्याचे, उजळणी करण्याचे काम ‘लोकसत्ता वर्षवेध’ करत असतो. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडी आपण वर्षभर वृत्तपत्रांतून, संकेतस्थळांवरून, समाजमाध्यमांवरून वाचत असतोच पण त्याचे एकत्रित संकलन आपल्याकडे नसते, नेमकी हीच कमी ‘लोकसत्ता वर्षवेध’ भरून काढतो. घडामोडींचे संकलन आणि समर्पक टिप्पणी. घडून गेलेल्या गोष्टींची माहिती महत्त्वाची असतेच कारण भूतकाळाचा मागोवा घेतल्यानंतरच भविष्याची आखणी आणि वर्तमानातील कार्य करणे सोपे जाते. मी यंत्र अभियांत्रिकी पदवीधर असून सध्या यूपीएससीची तयारी करत आहे. त्याचबरोबर मी अनेक वक्तृत्व स्पर्धामध्ये सहभागी होतो, सामाजिक विषयांवर अभ्यास उत्कृष्ट वक्ता होण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्या प्रवासात ‘लोकसत्ता वर्षवेध’ अतिशय उपयुक्त ठरते.

राहुल देसाई, गडहिंग्लज

प्रायोजक : तन्वी हर्बल्स प्रस्तुत, सहप्रायोजक : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), ग्रॅव्हिटास फाऊंडेशन, सिडको, रुनवाल ग्रुप;  पॉवर्ड बाय : एमआयडीसी, व्ही.पी.बेडेकर अ‍ॅण्ड सन्स, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड., केसरी टूर्स, एम. के. घारे ज्वेलर्स, इन्फ्राटेक आणि लक्ष्य अ‍ॅकॅडमी. बँकिंग पार्टनर :  ठाणे जनता सहकारी बँक लिमिटेड.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2020 4:40 am

Web Title: student preferences loksatta varsh vedh abn 97
Next Stories
1 निमित्त ‘केसरी’चे.. : ‘कलाक्षेत्राच्या चौकटी मोडायला हव्या’
2 विदेशी वारे : ट्रम्प, ऑस्कर आणि पॅरासाईट
3 पाहा नेटके : जीवघेणा हव्यास
Just Now!
X