बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचे वडील दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांचा आज वाढदिवस…त्यांच्या ७६ व्या वाढदिवसाच्या काही दिवसांपूर्वीच २५ मे २००५ मध्ये ह्दय विकाराच्या झटक्याने मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. आज त्यांची ९२ वी जयंती आहे. यानिमित्ताने बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘संजू’ या संजय दत्त याची बायोपिकमध्ये अभिनेते परेश रावल यांनी सुनील दत्तची भूमिका साकारली होती. खऱ्या आयुष्यात सुनील दत्त आणि परेश रावल या दोघांमध्ये घट्ट मैत्री होती. सुनील दत्त यांनी परेश रावल यांना लिहिलेलं पत्र त्यांच्या मैत्रीचं प्रतिक ठरलं.

सुनील दत्त यांनी त्यांच्या निधनाच्या काही दिवसांपूर्वीच अभिनेते परेश रावल यांना एक पत्र लिहिलं होतं. २०१८ मध्ये जेव्हा ‘संजू’ चित्रपट रिलीज झाला, त्यावळी अभिनेते परेश रावल यांनी स्वतः ही गोष्ट माध्यमांसोबत शेअर केली. तसंच त्यांनी दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांच्यासोबतच्या मैत्रीबाबत देखील त्यांनी काही गोष्टी शेअर केल्या. परेश रावल यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने सुनील दत्त यांनी हे पत्र लिहिलं होतं. त्यावेळी सुनील दत्त खासदार होते.

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”
pankaja munde manoj jarange
“मला खात्री आहे, ती माणसं…”, प्रचारावेळी राडा करणाऱ्यांबाबत पंकजा मुंडेंचं वक्तव्य; मनोज जरांगेंचा उल्लेख करत म्हणाल्या…
kiran mane post for uddhav thackeray
“त्यांनी बाळासाहेबांना आंधळेपणानं ‘कॉपी पेस्ट’ केलं नाही,” उद्धव ठाकरेंबद्दल अभिनेत्याची पोस्ट; म्हणाले, “काळाची पावलं…”

एक खासदार या नात्याने त्यांच्या लेटरहेडच्या पत्रात सुनील दत्त यांनी लिहिलं, “प्रिय परेश जी…३० मे रोजी तुमचा वाढदिवस असतो…तुमच्या जीवनात कायम सुख, समृद्धी आणि सौभाग्य लाभो अशी प्रार्थना करतो…तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबावर देवाचा नेहमीच आशिर्वाद राहू देत”.

Suni-Dutt-Letter-To-Paresh-Rawal

‘इंडियन एक्स्प्रेस’सोबत बोलताना अभिनेते परेश रावल म्हणाले, “सुनील दत्त यांच्या निधनाबद्दल ज्यावेळी मला कळलं, त्याच क्षणी मी माझी पत्नी स्वरूप संपतला फोन केला आणि घरी उशिरा येणार असं सांगितलं. त्यावेळी माझी पत्नी स्वरूप संपतने मला सांगितलं की, सुनील दत्त यांनी माझ्यासाठी एक पत्र पाठवलंय. माझ्या वाढदिवसासाठी त्यांनी हे पत्र लिहिलं असल्याचं तिने सांगितलं. माझा वाढदिवस ३० मे रोजी म्हणजेच घटनेच्या पाच दिवसानंतर होता. त्यानंतर पत्नी स्वरूप संपतने मला ते पत्र वाचून दाखवलं. सुनील दत्त यांनी माझ्या वाढदिवसाच्या पाच दिवस अगोदरच मला हे पत्र पाठवलं याचं मला खूप आश्चर्य वाटलं. आम्ही कधीच एकमेकांना पत्र लिहिलं नव्हतं.”