News Flash

Video : आ रही है पुलिस! ‘सूर्यवंशी’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

जाणून घ्या, कधी प्रदर्शित होणार 'सूर्यवंशी'

‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या माध्यमातून कतरिना कैफ आणि अक्षय कुमार ही जोडी बऱ्याच वर्षांनंतर एकत्र झळकणार आहे. या चित्रपटात ही जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अनोख्या पद्धतीने ही तारीख जाहीर करण्यात आली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.

चित्रपटाच्या टीमने एक व्हिडीओ शेअर करत ‘सूर्यवंशी’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. प्रदर्शित झालेल्या व्हिडीओमध्ये अभिनेता रणवीर सिंग, अजय देवगण, अक्षय कुमार आणि कतरिना कैफ दिसून येत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला रणवीर सिंगजवळ काही लहान मुलं येतात आणि त्याला एक कागद दाखवतात या कागदावर २४ मार्च ही तारीख लिहीलेली असते. हाच कागद ते अजय आणि अक्षयलाही दाखवतात आणि व्हिडीओच्या अखेरीस चित्रपगृह दाखवत हा चित्रपट २४ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं जाहीर करतात.

विशेष म्हणजे २४ मार्च रोजी मुंबईतील चित्रपटगृह रात्रंदिवस खुले राहणार असून २५ तारखेला गुढीपाडव्याची सुट्टी आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये सूर्यवंशी नक्की पाहा असं आवाहन ही लहान मुलं करत आहेत. तसंच चित्रपटाचा ट्रेलर २ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वाचा : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या ड्रायव्हरची अशी होते नियुक्ती

दरम्यान, रोहित शेट्टी, ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून या चित्रपटामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कतरिना कैफ आणि जॅकी श्रॉफ हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 11:09 am

Web Title: suryavanshi release date launched in very unique style ssj 93
Next Stories
1 BLOG : ‘चाँदनी’ला आठवताना…
2 Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय ‘या’ हॉलिवूडपटांमध्ये काम
3 ‘तेव्हा मी १५ वर्षांची होती’; चुकीचे वय सांगितल्याने स्वरा भास्कर ट्रोल