छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे कायमच चर्चेत असते. या मालिकेतील एका कलाकाराला मुंबई पोलिसांनी चेन स्नॅचिंगमध्ये अटक केली आहे. क्रिकेट सट्टेबाजीची वाईस सवय असल्याने या कलाकारावर लाखो रुपयांचे कर्ज होते. त्यानंतर कर्ज फेडण्यासाठी त्याने गुन्हेगारीच्या दुनियेत पाय ठेवले.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, मिराज कापरी असे या कलाकाराचे नाव आहे. क्रिकेट सट्टेबाजीत ३० लाख रुपये गमावल्यानंतर त्याने कर्जाची परतफेड करण्यासाठी चेन स्नॅचिंग सुरू केले. तो त्याच्या काही मित्रांसोबत मुंबईच्या रस्त्यावर आपल्या मित्रांसोबत उभा राहून चेन स्नॅचिंग करायचा. त्याला सुरतमध्ये अटक करण्यात आले. त्याला सुरतमध्ये अटक करण्यात आले.

पोलिसांनी मिराज कापरी आणि त्याचा मित्र वैभव जाधव यांना अटक केली आहे. एका खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसानी दोघांना अटक केली. अटकेनंतर या दोघांकडून ३ सोन्याच्या चेन, २ मोबाईल आणि चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपी वैभव आणि मिरज हे जुनागडचे रहिवासी आहेत.

अटकेनंतर दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून दोघांनी कोणत्या सोनाराकडे चोरीचं सोनं विकलं याचा पोलीस तपास करत आहेत. मिराजने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’, ‘संयुक्त’, ‘थापकी मेरे अंगणे में’ यासह अनेक फेमस हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. इतर अनेक मालिकांमध्येही त्याने साईड रोल केले आहेत. पण मालिकांच्या कमाईमुळे त्याचे भागत नव्हते म्हणून तो सट्टेबाजी करत असल्याचे मिराजने मान्य केले आहे.