मार्च महिन्यापासून देशामध्ये करोनाने थैमान घातलं आहे. आतापर्यंत अनेक जणांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण करोना पॉझिटिव्ह आढळल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता राहुल सुधीर याला करोनाची लागण झाली आहे. राहुलने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली.
राहुल छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता असून ‘इश्क में मरजावां 2’ या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला आहे. याच मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्याने करोना चाचणी केली होती. त्यानंतर त्याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सध्या राहुल होम क्वारंटाइन असल्याचं त्याने सांगितलं आहे.
दरम्यान, राहुल सध्या ‘इश्क में मरजावां 2’ या मालिकेत वंश राय सिंघानिया या मुख्य भूमिकेत झळकत आहे. राहुलपूर्वी राजेश्वरी सचदेव, श्वेता तिवारी, पार्थ समंथान, सचिन त्यागी, हिमानी शिवपुरी, संजय कौशिक यांनादेखील करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं.