News Flash

‘कुमकुम’ फेम जुही-सचिन अखेर या दिवशी विभक्त होणार!

मालिकेतील कुमकुम या पात्रामुळे जुही परमार ही अभिनेत्री ख-या अर्थाने नावारुपाला आली.

जुही-सचिन

२००२ ते २००९ या कालावधीमध्ये स्टारप्लस या वाहिनीवरील ‘कुमकुम – एक प्यारासा बंधन’ ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेची रचना, त्याच्यातील संवाद आणि मालिकेतील कलाकारांनी वठविलेली भूमिका यामुळे ही मालिका विशेष लोकप्रिय ठरली होती. इतकंच नाही तर मालिकेतील कुमकुम या पात्रामुळे जुही परमार ही अभिनेत्री ख-या अर्थाने नावारुपाला आली. ‘कुमकुम’मुळे स्वतंत्र ओळख मिळालेली जुही मालिकेप्रमाणेच तिच्या वैवाहिक आयुष्यामुळेदेखील विशेष चर्चेत आली.
‘कुमकुम’ मालिका यशाचं शिखर गाठत असतानाच जुहीने छोट्या पडद्यावरील अभिनेता सचिन श्रॉफ याच्याशी लग्नगाठ बांधली होती. मात्र त्यांचे नातं फार काळ टिकून शकले नाही. जुही-सचिनमध्ये ल्गनानंतर ही काळातच वादविवाद होऊ लागले आणि ते स्वतंत्र राहू लागले. यावेळी जुहीने तिच्या मुलीचा सांभाळ केला. मात्र हे वाद सध्या विकोपाला गेले असून या जोडीने कायदेशीरित्या वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १०  वर्षांचं त्यांचं नात आता संपुष्टात येणार आहे.

२००९ मध्ये लग्नगाठ बांधलेली ही जोडी १० वर्षानंतर कायदेशीररित्या घटस्फोट घेणार असून येत्या २५ जून रोजी ते कायमचे वेगळे होणार आहेत, अशी माहिती स्वत: जुहीने दिली आहे. जुही आणि सचिन वेगळे राहत असतानादेखील त्यांनी अनेक मालिकांमध्ये एकत्र काम केले आहे. मात्र एकत्र काम करतानादेखील त्यांच्या नात्यातील कटूता कमी झाली नाही.

दरम्यान, जुहीचा स्वभाव माझ्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. ती प्रचंड चिडते. तिच्या याच स्वभावामुळे आमच्या अनेक वेळा वाद होत असल्याचं सचिनने सांगितलं होतं. याच वादविवादामुळे २५ जूनला ही जोडी विभक्त होणार आहे. मात्र सचिन आणि जुही यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 2:15 pm

Web Title: tv actress juhi parmar and sachin shroff getting divorce on this date
Next Stories
1 Mumbai monsoon updates: अतिपावसामुळे मुंबई तुंबली; महापालिकेचे स्पष्टीकरण
2 ..अन् ‘दस का दम’च्या सेटवर अनिल कपूरने मागितली जाहीर माफी
3 मिस्टर परफेक्शनिस्टवर का आली ट्रोल होण्याची वेळ ?
Just Now!
X