News Flash

Photo : गणिताच्या जादूगार शकुंतला देवी यांच्या भूमिकेत विद्या; पाहा लूक

१९८२ साली शकुंतला देवी यांच्या कामाची दखल गिनीज बुक ऑफ रेकॅार्डने घेतली

विविध अभ्यासपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर कायमच अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री विद्या बालन लवकरच एक नवीन व्यक्तिरेखा साकारत आहे. ‘सुलू’ असो किंवा मग ‘बेगमजान’ प्रत्येक भूमिकेला तितक्याच प्रभावीपणे रुपेरी पडद्यावर उतरवणारी विद्या नेहमीच तिच्या अभिनयाच्या माध्यमातून अनेकांना आश्चर्यचकित करत असते. त्यातच आता ती प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. नुकताच या चित्रपटातील विद्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.

शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन अनु मेनन करत असून या चित्रपटामध्ये विद्या बालन शकुंतला देवी यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. त्यातच या चित्रपटातील विद्याचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं असून चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून ते सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

दरम्यान, शकुंतला देवींचा जन्म १९२९ मध्ये बंगळूरूमध्ये झाला. लहानपणीच त्यांच्या वडिलांना त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची प्रचिती आली. त्यांनी गणिताबरोबर ज्योतिषशास्त्रावर सुद्धा अनेक पुस्तकं लिहिली आहेत. १९८२ साली गिनीज बुक ऑफ रेकॅार्डने त्यांच्या कामाची दखल घेतली. त्यानंतर आता त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून हा चित्रपट २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स नेटवर्क्स प्रॉडक्शन्स आणि विक्रम मल्होत्रा करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 5:23 pm

Web Title: vidya balan upcoming movie shakuntala devi first look out ssj 93
Next Stories
1 मिलिंद सोमणची छोट्या पडद्यावर वापसी, साकारणार ‘ही’ भूमिका
2 विसरभोळ्या शबाना आझमी, या पुरस्काराबद्दल आठवेना
3 मुलासाठी अक्षय कुमारची भावनिक पोस्ट