02 March 2021

News Flash

इमरानसोबत अजून चित्रपट करण्याची विद्या बालनची इच्छा

घनचक्कर' अभिनेता इमरान हाश्मीसोबत अधिकाधिक चित्रपट करण्याची इच्छा आज (सोमवार) विद्या बालनने व्यक्त केली. इमरानसोबत 'घनचक्कर'मध्ये काम करण्याचा अनुभव रोमांचक होता.

| June 24, 2013 07:31 am

घनचक्कर’ अभिनेता इमरान हाश्मीसोबत अधिकाधिक चित्रपट करण्याची इच्छा आज (सोमवार) विद्या बालनने व्यक्त केली. इमरानसोबत ‘घनचक्कर’मध्ये काम करण्याचा अनुभव रोमांचक होता. मला आशा आहे की अजूनही काही दिग्दर्शक आम्हा दोघांना एकत्र घेऊन चित्रपट करतील. तसेच, चित्रपटातील आमच्या दोघांची केमिस्ट्री बघता दिग्दर्शक राजकुमार गुप्ता आणखीन काही चित्रपट आमच्यासोबत करतील, असे विद्या बालनने चित्रपटाची प्रसिद्धी करताना म्हटले.
‘द डर्टी पिक्चर’ नंतर इमरानबरोबर इतक्या लवकर कोणताही चित्रपट करेन असा विचार विद्याने केला नव्हता. ‘घनचक्कर’ हा एक वेगळा चित्रपट आहे आणि दोघांनीही अशा प्रकारची भूमिका यापूर्वी केली नसल्याचे तिने सांगितले. विद्याने सदर चित्रपटात नीतू अथरे (मिसेस घनचक्कर) ची भूमिका केली आहे.
‘घनचक्कर’ २८ जूनला चित्रपटगृहात दाखल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2013 7:31 am

Web Title: vidya wants to work in more films with emraan hashmi
Next Stories
1 अमोल गुप्तेचा आगामी चित्रपट फॉक्स स्टारबरोबर
2 ‘डर्टी पॉलिटिक्स’मध्ये अमिताभऐवजी नसिरुद्दीन शाह
3 जॉन अब्राहम करणार बॉक्सिंगचा प्रचार
Just Now!
X