News Flash

…म्हणून सलमानने ‘राधे’ला मल्टीपल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा घेतला निर्णय

अभिनेत्री दिशा पाटनीने सांगितलं सत्य

बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानचा ‘राधे’ चित्रपट येत्या १३ मे रोजी काही निवडक थिएटर, झीप्लेक्ससह विविध प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मेकर्सने आतापर्यंत चित्रपटातील ‘सीटी मार’ आणि ‘दिल दे दिया’ ही गाणी रिलीज केली आहेत. आता ‘राधे’ चित्रपटाचा टायटल ट्रॅकही प्रदर्शित झाला आहे. सुरवातीला करोना परिस्थितीमुळे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार का ? याबाबत शंका होत्या. परंतू ‘एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी फिर तो मैं अपने आप की भी नहीं सुनता …’ या सलमान खानच्या डायलॉगप्रमाणेच तो आपल्या कमिटमेंटवर टिकून राहीला.

अनेक चित्रपटांचं शूटिंग झालेलं असतानाही ते चित्रपट रिलीज न करता लॉकडाउन संपण्याची वाट बघण्यात अनेक निर्मांत्यांनी धन्यता मानली. अशा परिस्थितीत ‘दबंग’ अभिनेता सलमान खानने त्याचा बहूचर्चित ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मसह काही निवडक थिएटरमध्ये सुद्धा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. खरं तर अभिनेता सलमान खानने घेतलेला हा निर्णय अत्यंत जोखमीचा असल्याची कुजबूज बॉलिवूडमध्ये सुरूये.

सलमानच्या या चित्रपटाला ऑनलाइन प्रदर्शित करण्यासाठी तब्बल 250 कोटींची ऑफर मिळाली होती. परंतु सलमानने ओटीटीला साफ नकार दिला. हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत थिएटर मध्ये सुद्धा प्रदर्शित होईल, अशी भूमिका त्याने घेतली आहे. एका माध्यम संस्थेशी बोलताना अभिनेत्री दिशा पाटनी हिने सलमानच्या या निर्णयाचं कौतूक केलं. तसंच सध्याच्या करोना परिस्थितीत हा निर्णय घेण्यासाठी सुद्धा मोठी हिंमत लागते, असंही ती यावेळी म्हणाली.

मल्टीपल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचं हे आहे कारण…
सध्याच्या करोना महामारीमुळे अनेक सिनेमागृह मालकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं आहे. सध्या देशात काही निवडक ठिकाणी लॉकडाउन सुरू आहेत. परंतू ज्या ठिकाणी लॉकडाउन नाही अशा ठिकाणी अभिनेता सलमान खानचा ‘राधे’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करावा, जेणेकरून गेल्या काही दिवसांत झालेलं नुकसान भरून काढता येईल, अशी विनंतीच थिएटर मालक आणि चित्रपट वितरकांनी केली होती. यावर सकारात्मक विचार करून अभिनेता सलमान खानने त्याचा आगामी ‘राधे’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला, असं अभिनेत्री दिशा पटानी माध्यमांशी बोलताना म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

एककीकडे सलमानच्या ‘राधे’ चित्रपटासाठी जोरदार प्रमोशन सुरू आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री दिशा पटानी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये ती रिवीलिंग ड्रेसमध्ये दिसून येतेय.

‘भारत’ चित्रपटानंतर सलमान खान आणि दिशा पाटनी यांचा एकत्र दुसरा चित्रपट आहे. आता त्यांनी ‘राधे’मध्ये एकत्र काम केलं आहे आणि त्याची जोडी प्रेक्षकांना आवडेल असंच वाटत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभू देवानं केलं असून सलमान खान आणि दिशा पाटनी यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 1:19 pm

Web Title: why did salman khan decide to release radhey on multimedia prp 93
Next Stories
1 “माझ्या देशासाठी ‘हा’ प्रश्न विचारत रहा”; चेतन भगतचं ट्विट चर्चेत
2 “मला आणि कुटुंबाला करोना होऊच शकत नाही कारण…”, राखी सावंतचा अजब दावा
3 निधनाच्या अफवांवर लकी अली यांची पोस्ट, म्हणाले…
Just Now!
X