मराठी मनोरंजनसृष्टीतून पुन्हा एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘आभाळमाया’ या मालिकेतील अभिनेते पराग बेडेकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ४७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मराठी मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारे पराग बेडेकर यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

पराग बेडेकर यांच्या निधनानंतर प्रसिद्ध लेखक चंद्रशेखर गोखले यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, पराग गेला? उत्कृष्ट अभिनेता, खूप सहज अभिनय करायचा, त्याच्या स्वत:च्या काही खास लकबी होत्या. बोलता बोलता नाक चोळण्याची त्याची खास स्टाईल होती. मी त्यावरुन छेडलं की छान हसायचा…हास्य तर लाजवाब होतं त्याचं… कुठे गेला कुठे गेला बा शोध अचानक थांबला.” चंद्रशेखर गोखले यांच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंट्स करत श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा- खऱ्या आयुष्यातील फिल्मी ट्विस्ट! मुलाने हत्या केल्याची चर्चा असलेल्या अभिनेत्री वीणा कपूर जिवंत; स्वत: पोलीस ठाण्यात पोहचल्या अन्…

याशिवाय अभिनेता सागर खेडेकरनेही पराग यांच्या निधनानंतर फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “अरे आपल्याला एकत्र पुन्हा एकदा नाटक करायचं होतं ना? मग? ‘यदा कदाचित’, ‘लाली लीला’ ह्या दोन नाटकांवरच मैत्री सोडून एवढ्या लांब गेलास? गेलास तो गेलास पुन्हा कधीच भेट होऊच शकत नाही ह्या जन्मात एवढ्या लांब..? असो बरं वाटत असेल तुला कदाचित पण यार आम्हाला दुःखी करून गेलास… मिस करीन तुला यार… जिथे कुठे असशील सुखी राहा मित्रा… पऱ्या तुझ्या आत्म्यास शांती मिळो..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान पराग खेडेकर यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं तर, त्यांनी ‘यदा कदाचित’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’, ‘पोपटपंची’, ‘सारे प्रवासी घडीचे’, ‘लाली लीला’ या नाटकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय ‘कुंकू’, ‘चारचौघी’, ‘एक झुंझ वादळाशी’, ‘ओढ लावी जिवा’, ‘आभाळमाया’ या लोकप्रिय मालिकांमध्येही त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या होत्या. ते एक उत्तम दिग्दर्शकही होते.