दिवंगत अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्याने धक्कादायक दावा केल्याने खळबळ उडाली आहे. गळफास घेतेलल्या आणि खून झालेल्या मृतदेहात खूप फरक असतो. सुशांतच्या गळ्यावर असलेले व्रण हत्या केल्यासारखे दिसत होते. त्याच्या अंगावरही मारहाणीचे व्रण दिसत होते असा दावा कूपर हॉस्पिटलमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करणारे रूपकुमार शाह यांनी हा दावा केला. या दाव्यावर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतंच यावर अभिनेते शेखर सुमनने याबद्दल ट्वीट करत भाष्य केले आहे.

कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा दावा काय?

“सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला तेव्हा आमच्याकडे ५ ते ६ मृतदेह शवविच्छेदनासाठी आले होते. त्यामध्ये एक आत्महत्या केलेला व्हीआयपी मृतदेह आला होता. जेव्हा तो मृतहेद शवविच्छेदन करण्यासाठी टेबलवर घेतला तेव्हा, तो सुशांतसिंह राजपूतचा असल्याचं कळलं. सुशांतच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आणि गळ्यावर दोन व्रण होते, हातापायवर मार लागून तुटल्यासारख्या खुणा होत्या. त्याची व्हिडीओ शूटींग करायला हवी होती, असं आमचं म्हणणं होतं. पण अधिकाऱ्यांनी फक्त फोटो काढायला सांगितलं. आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगितलं की, ही हत्याच वाटत आहे. त्यापद्धतीने त्यावर काम करावं, पण वरिष्ठ म्हणाले तत्काळ शवविच्छेदन करुन मृतदेह द्यायचा आहे,” असा दावा शाह यांनी केला आहे.
आणखी वाचा : “१ जूनला आम्ही ग्रुप बनवला अन् १४ दिवसांनी…” सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना प्रार्थना बेहरेने व्यक्त केली खंत

Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”

अभिनेते शेखर सुमन यांनी याबद्दल नुकतंच ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी सुशांत सिंह राजपूतबद्दल समोर दाव्याबद्दल भाष्य केले आहे. “सुशांत सिंग राजपूतच्या कथित आत्महत्येप्रकरणी रुपकुमार शाहने धक्कादायक दावा केल्याने खळबळ उडाली आहे. त्याचे खळबळजनक विधान पाहता आम्ही सीबीआयला याबद्दल त्वरित दखल घेण्याचे आवाहन करतो. निश्चितपणे हा एक पुरावा आहे, ज्यामुळे हे कटकारस्थान समोर येऊ शकते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी नक्कीच न्याय मिळायला हवा”, असे शेखर सुमन यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : विस्कटलेले केस, वाढलेली दाढी अन्…; मृत्यूपूर्वी सुशांत सिंह राजपूतची झाली होती दयनीय अवस्था? जुना व्हिडीओ व्हायरल

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत १४ जून २०२० रोजी वांद्रे येथील त्याच्या घरात आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळला होता. अभिनेत्याच्या अचानक जाण्याने खळबळ उडाली होती. मुंबई पोलीस, ईडी, सीबीआय आणि एनसीबी या सर्व तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. चौकशीअंती सुशांतची हत्या नाही, तर आत्महत्याच होती, असा निर्णय अधिकाऱ्यांनी दिला होता. आता या नव्या दाव्याचा तपास केला जातो की नाही, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.