११ ऑक्टोबर म्हणजेच उद्या बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा ७५ वा वाढदिवस आहे. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण बच्चन कुटुंब मालदीवला रवाना झाले आहे. बिग बी, ऐश्वर्या, अभिषेक, आराध्या आणि श्वेता नंदा या ट्रिपला निघाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिषेक आणि ऐश्वर्याने मिळून मालदीवमधील सेलिब्रेशनचं नियोजन केलं असून आठवडाभर ते तिथेच राहणार आहेत. बिग बींची नात आराध्याने तिच्या आजोबांसाठी एक खास भेटकार्डही तयार केलं असून हे भेटकार्ड ती उद्या त्यांना देणार आहे. गेल्या वर्षी अभिषेकचा वाढदिवससुद्धा मालदीवलाच साजरा करण्यात आला होता. त्याच हॉटेलमध्ये बच्चन कुटुंबीय राहणार आहेत. अभिषेकने क्रूजवर केक कापण्याचा प्लॅन केला आहे.

वाचा : ‘पद्मावती’ पाहण्यासाठी दीपिकाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर प्रचंड उत्सुक

बिग बींना आपल्या वाढदिवशी संपूर्ण वेळ फक्त त्यांच्या कुटुंबाला द्यायचा आहे आणि मुंबईत राहून हे शक्य झालं नसतं. म्हणूनच ऐश्वर्या-अभिषेकने त्यांच्यासाठी मालदीव ट्रीपचा प्लॅन केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya abhishek shweta heading out for maldives to celebrate amitabh bachchan 75th birthday
First published on: 10-10-2017 at 15:53 IST