बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा पहिला ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. अॅक्शन सीन्सने भरलेला हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे.

‘सूर्यवंशी’च्या ट्रेलरमध्ये अक्षय भन्नाट स्टंट करताना दिसत आहे. विशेष करुन त्याने हॅलिकॉप्टरवर केलेला स्टंट प्रेक्षकांना विशेष आवडला आहे. या स्टंटची तुलना अक्षयने सबसे बडा खिलाडी या चित्रपटात केलेल्या स्टंटशी केली जात आहे.

१९९५ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अक्षयने ‘सूर्यवंशी’प्रमाणेच एक हॅलिकॉप्टरवर स्टंट केला होता. फरक फक्त इतकाच की त्यावेळी तो सायकलवरुन हॅलिकॉप्टर चढला होता व यावेळी त्याने तोच स्टंट करण्यासाठी भरधाव वेगाने पळणाऱ्या बाईकचा आधार घेतला.

‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी याने केले आहे. हा चित्रपट १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्ब ब्लास्टवर आधारित आहे. तसेच या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेता अजय देवगण, रणवीर सिंग, कतरिना कैफ देखील झळकणार आहेत.