‘आयला रे आयला’रणवीर-अजय-अक्षयची केमिस्ट्री, ‘सूर्यवंशी’चं पहिलं गाणं रिलीज

५ नोव्हेंबर रोजी ‘सुर्यवंशी’ हा चित्रपट आपल्याला चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

akshay kumar, ranveer singh, ajay devgn, sooryavanshi,
५ नोव्हेंबर रोजी 'सुर्यवंशी' हा चित्रपट आपल्याला चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिन कैफ यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण आता अखेर ५ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, चित्रपटाचं पहिलं गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे.

अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘सूर्यवंशी’ या चित्रपटातलं पहिलं गाणं शेअर केलं आहे. या गाण्याचं नाव ‘आयला रे आयला’ असं आहे. हे गाणं अक्षयच्या ‘खट्टा मिठ्ठा’ या चित्रपटातील आहे. या गाण्यात अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंह हे तिघेही दिसत आहेत. अक्षयने ‘हे गाणं शेअर करत ‘जेव्हा सिंघम, सिंबा आणि सुर्यवंशी एकत्र येतात तेव्हा उत्सव होतो’, या आशयाचे कॅप्शन दिले आहे. हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. एवघ्या १३ मिनिटांमध्ये गाण्याला १ लाख पेक्षा जास्त नेटकऱ्यांनी हे गाणं पाहिलं आहे.

आजपासून ‘सुर्यवंशी’च्या प्रमोशनला सुरुवात झाली आहे. तर २४ ऑक्टोबरला चित्रपटातील दुसरे गाणे प्रदर्शित होणार आहे. हे गाणे अक्षय कुमार आणि कतरिना कैफ या दोघांवर चित्रित करण्यात आले आहे.

आणखी वाचा : जात लपवण्यासाठीच वडिलांनी स्वीकारलं ‘बच्चन’आडनाव, अमिताभ यांचा खुलासा

शुक्रवारी १५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या शुभमुहर्तावर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टीफिकेशन (CBFC) सीईओ रविंद्र भाकड यांना ‘सूर्यवंशी’ चित्रपट दाखवण्यात आला. हा चित्रपट पाहिल्यानंतर सेन्सॉर बोर्डाकडून त्याला U/A सर्टिफिकेट मिळाले आहे. तसेच या चित्रपटातील कोणाताही सीन वगळला किंवा कापला जाणार नाही, असेही सेन्सॉर बोर्डाने सांगितले आहे.

आणखी वाचा : आई कुठे काय करते : अरुंधतीच्या आयुष्यात होणार ‘या’ खास व्यक्तीची एण्ट्री

‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिन कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. जवळपास वर्षभरापासून या चित्रपटाचे प्रदर्शन थांबलेले आहे. आता चित्रपटगृहे सुरु होणार असल्यामुळे चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akshay kumar ranveer singh ajay devgn sooryavanshi movie aila re aillaa song out dcp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या