‘राधे माँ’, यामी गौतमचा लग्नातील ड्रेस पाहून कलाकारांनी उडवली खिल्ली

आयुषमान खुराना आणि विक्रांत मेस्सीने फोटो पाहून यामीची खिल्ली उडवली आहे. यामीने ४ जून रोजी दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न गाठ बांधली आहे.

yami gautam wedding photo
यामी आणि आदित्यने ४ जून रोजी लग्न बंधनात अडकले. (Photo Credit : Yami Gautam Instagarm and File Photo)

अभिनेत्री यामी गौतम ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. यामीने बॉलिवूड दिग्दर्शक आदित्य धर याच्याशी ४ जून रोजी लग्न गाठ बांधली. त्यांच्या लग्नाची बातमी यामीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली. त्या आधी ते दोघे लग्न करणार आहेत या बद्दल कोणालाही माहित नव्हत. त्यांच्या लग्नाचे फोटो हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. आता त्यांच्या लग्नाच्या आधी असलेल्या आणि नंतरच्या कार्यक्रमातील अनेक फोटो हळुहळु सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.

यामीने तिच्या लग्नातील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. मात्र, हे फोटो पाहिल्यानंतर यामीचे सहकलाकार अभिनेता आयुषमान खुराना आणि विक्रांत मेस्सी यांनी यामीची खिल्ली उडवली आहे. यामीने शेअर केलेल्या फोटोत तिने लग्नात लाल रंगाची साडी परिधान केल्याचे दिसत आहे. तर तिच्या हातात कलिरे आहेत. हा फोटो पाहताच आयुषमान म्हणाला, “पूर्ण जय माता दी सारखं वाटतं आहे. तुम्ही दोघे ज्वालाला गेला होतात?” तर दुसरीकडे विक्रांत म्हणाला, “राधे मॉं सारखी पवित्र आणि शुद्ध दिसत आहेस.”

आणखी वाचा : न्यूड सीन देण्याआधी राधिका आणि आदिल मध्ये झाले होते ‘हे’ बोलणे

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

ayushmann-khurrana-and-vikrant-massey-hilarious-comments
आयुषमान खुराना आणि विक्रांत मैस्सी यांनी यामीची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान, आदित्य आणि यामीने ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं आहे. त्यानंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये आल्याच्या चर्चा आहेत. तर, यामी लवकरच ‘भूत पोलिस’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात यामीसोबत जॅकलिन फर्नांडिस, अर्जुन कपूर आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत असतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ayushmann khurrana and vikrant massey hilarious comments on yami gautam s wedding look dcp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या