VIDEO : कतरिना रणबीरला म्हणतेय ‘माझ्या डोळ्यात बघ’

चित्रीकरणादरम्यान कतरिना रणबीरला म्हणाली की, ‘माझ्या डोळ्यात बघ’

ranbir kapoor, katrina kaif
रणबीर कपूर, कतरिना कैफ

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ ही बॉलिवूडची बहुचर्चित जोडी. दोघांची पडद्यावरील आणि पडद्यामागील केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. दोघांमधील कथित प्रेमसंबंध तुटले असले तरी आगामी ‘जग्गा जासूस’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघे मिळून मेहनत घेताना दिसताहेत. ‘जग्गा जासूस’च्या सेटवरील एक गमतीशीर व्हिडिओ ‘यूटीव्ही मोशन पिक्चर्स’ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

गुंडांपासून वाचण्यासाठी दोरीच्या साहाय्याने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न रणबीर आणि कतरिना या दृष्यामध्ये करत आहेत. उंचावरून या दृष्याचे चित्रीकरण सुरु असताना सीगल पक्षी सारखा मधे येत होता. त्या भीतीने रणबीरने अखेर हे दृष्यच न करण्याचे ठरविले होते. मात्र कतरिनाने रणबीरला धाडसाने हे दृष्य करण्यास सांगितले. या व्हिडिओमध्ये कतरिना त्याला म्हणतेय की, ‘माझ्यात डोळ्यात बघ.’ कतरिनाने इतक्या आत्मविश्वासाने असे म्हटल्यावर रणबीरला ते दृष्य करण्यास भाग पडले आणि नंतर चांगल्याप्रकारे त्याचे चित्रीकरणही करण्यात आले.

दोघांच्याही ब्रेकअपआधी की ब्रेकअपनंतर या दृष्याचे चित्रीकरण झाले हे जरी कळाले नसले तरी या व्हिडिओमधील दोघांची केमिस्ट्री पाहण्याजोगी आहे. ब्रेकअपनंतर रणबीरसोबत ‘जग्गा जासूस’चे प्रमोशन करणार नसल्याचं कतरिनाने ठरवलं होतं. मात्र याचा फटका चित्रपटाला बसू नये यासाठी दोघेही एकत्र प्रमोशन करू लागले आहेत. प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत रणबीरसोबत पुन्हा एकत्र काम करणार नसल्याचं कतरिनाने म्हटलं होतं.

वाचा : बी-टाऊनमध्ये आता ‘मी’पणाला जास्त महत्त्व – काजोल

दिग्दर्शक अनुराग बासू यांचा ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट ७ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रणबीर कपूर सध्या अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे तर कतरिनाने नुकतीच माल्टा येथे ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Behind the scenes video of jagga jasoos ranbir kapoor and katrina kaif