scorecardresearch

Premium

पवन कल्याणने उडवली जॉन अब्राहमची झोप, ‘पुष्पा’नंतर ‘हा’ चित्रपट होणार हिंदीत प्रदर्शित

प्रेक्षकांना दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळताना पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे.

pawan kalayan, john abraham,
प्रेक्षकांना दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळताना पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे.

चित्रपटप्रेमी आता फक्त बॉलिवूड चित्रपट नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळत आहेत. गेल्या काही काळापासून बॉलिवूड कुठे तरी मागे राहिलं असून आता दाक्षिणात्य चित्रपटांचीच चर्चा सुरु असल्याचं आपण पाहतो. नुकताच दाक्षिणात्य अभिनेता रवी तेजाचा ‘खिलाडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याआधी अल्लू अर्जुन, प्रभास, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी हिंदी प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमात पाडलं. त्यात आता पॉवरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवन कल्याण यांचा ‘भीमला नायक’ हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित होणार आहे.

तेलुगू मीडिया पोर्टलद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे निर्माते नागा वामसी यांनीही एका कार्यक्रमादरम्यान याची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सागर के चंद्रा आहेत. या चित्रपटात पवन कल्याणसोबत राणा दग्गुबतीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल हिंदी प्रेक्षकांमध्ये बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता होती. विशेष गोष्ट म्हणजे, बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर या चित्रपटाच्या कथेवर हिंदी चित्रपट घेऊन येण्याच्या तयारीत आहेत.

chamkila-movie-release-date
ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार इम्तियाज अलीचा बहुचर्चित चित्रपट ‘अमर सिंह चमकीला’; वाचा कुठे पाहायला मिळणार?
Song from the movie Jaga Char Diwas produced by Jagruti Entertainment news
‘जगा चार दिवस’ चित्रपटाचा गीत ध्वनिमुद्रणाने मुहूर्त..
article-370-box-office-record
‘आर्टिकल ३७०’ने मोडला ‘द काश्मीर फाइल्स’चा रेकॉर्ड; पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
razakar-trailer
“ओम शब्द आणि भगवा रंग…”, हैदराबाद नरसंहारावर बेतलेल्या ‘रजाकार’ चित्रपटाचा अस्वस्थ करणारा ट्रेलर प्रदर्शित

आणखी वाचा : मलायकाला मुलगा अरहान आई म्हणून नाही तर ‘या’ नावाने मारतो हाक

आणखी वाचा : “मी उघड्यावर शौचाला बसलो आणि मागे वळून पाहतो तर हॉलिवूडचे…”, करण जोहरने सांगितला ‘तो’ लाजिरवाणा किस्सा

दरम्यान, पवन कल्याण आणि जॉन अब्राहमचा हा चित्रपट मुळात मल्याळम चित्रपट ‘अय्यपन कोशियम’चे रिमेक आहेत. हिंदी आणि तेलगू चित्रपट निर्मात्यांनी या मल्याळम चित्रपटाचे हक्क विकत घेतले होते. त्यानंतर जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर हा चित्रपट हिंदीत आणणार आहेत. तर तेलुगूमध्ये पवन कल्याण आणि राणा दग्गुबती दिसणार आहेत. ‘भीमला नायक’ हा चित्रपट जवळजवळ तयार आहे आणि एप्रिल २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. तर जॉनच्या चित्रपटाचे सध्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरु आहे. अशा परिस्थितीत ‘भीमला नायक’च्या निर्मात्यांनी हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित करण्याची घोषणा केल्याने जॉन अब्राहमची चिंता नक्कीच वाढणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bheemla nayak pawan kalyan rana daggabuti film to be release in hindi too big problem ahead for john abraham dcp

First published on: 12-02-2022 at 14:15 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×