बिपाशा आणि करणच्या लग्नाचा मुहूर्त ठरला?

दोघांनी याची जाहीर कबुली दिली नसली तरी हे दोघंही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसून आले.

Bipasha Basu , Karan Singh Grover , Bollywood, wedding , bollywood couples, marriage , Loksatta, loksatta news, Marathi, marathi news
Bipasha Basu and Karan Singh Grover : सूत्रांच्या माहितीनुसार येत्या ३० एप्रिलला मुंबई उपनगरातील एका हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या लग्नाला कुटुंबियांकडून अखेर होकार मिळाला असून पुढील महिन्यात हे दोघेजण विवाहबद्ध होणार असल्याचे वृत्त आहे. करणची आई बिपाशाला सून म्हणून स्विकारण्यास तयार झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या ३० एप्रिलला मुंबई उपनगरातील एका हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. मात्र, आत्तापर्यंत दोघांकडूनही या वृत्ताला अधिकृतपणे दुजोरा देण्यात आलेला नाही. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलीवूडमधील अनेक जोडप्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बिपाशा आणि करणच्या लग्नाची बातमी चाहत्यांसाठी एक सुखद धक्का ठरू शकतो.
बिपाशा आणि करण यांनी ‘अलोन’ या भयपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर त्यांच्यातील प्रेमसंबंधांची चर्चा बॉलीवूडमध्ये रंगू लागली होती. दोघांनी याची जाहीर कबुली दिली नसली तरी हे दोघंही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसून आले. दरम्यान, करणने त्याची पत्नी जेनेफरशी घटस्फोट घेतल्याचीही चर्चा बॉलीवूड वर्तुळात आहे. २०१२ साली करणचे जेनेफरशी लग्न झाले होते.

बिपाशा-करणच्या फुलू पाहणाऱ्या नात्यात कुटुंबीयांची आडकाठी 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bipasha basu and karan singh grover getting married in april

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या