Aamir Khan On Marriage: आमिर खान लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर लोकप्रिय अभिनेत्री जिनिलीया देशमुखदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेता त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील मोठ्या चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो गौरी स्प्रॅटला डेट करत असल्याचे समोर आले. अभिनेत्याने स्वत:च याचा खुलासा केला. आता तो त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.
त्यामुळे मला स्वत:ला…
आमिर खानने नुकतीच राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती, यावेळी त्याने लग्नाबाबत त्याचे मत व्यक्त केले. अभिनेता म्हणाला, “आजच्या तारखेला मी कोणाला भेटलो तर मी चार महिन्यात लग्नाचा निर्णय घेऊ शकतो का? तर मी हा निर्णय घेऊ शकत नाही, असे वाटते. कारण मला त्या व्यक्तीबरोबर संपूर्ण आयुष्य एकत्र काढायचे आहे.”
रीना दत्ता यांच्याबरोबर लग्न करण्यापूर्वी आमिर खानने थेरपी घेतली नव्हती. यावर बोलताना आमिर म्हणाला, “त्यावेळी मी थेरपी घेत नव्हतो, आजकाल मी थेरपी घेतो, त्यामुळे मला स्वत:ला अधिक समजण्यास मदत होते. मला गोष्टी समजू लागल्या आहेत. मी स्वत:ला अधिक जाणून घेत आहे. आता मला फार लवकर रेड फ्लॅग दिसतात.”
अभिनेत्याने मार्च महिन्यात त्याचा ६० वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याने त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची ओळख करून दिली. तसेच ते रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासादेखील केला. त्यानंतर गौरी व आमिर विविध कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावताना दिसतात. त्याने रिलेशनशिपचा खुलासा केल्यानंतर आमिर खान मोठ्या चर्चेत होता.
आमिर खानने याआधी दोनवेळा लग्न केले. त्याने पहिले लग्न रीना दत्ता यांच्याबरोबर केले. १९८६ साली त्यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांना दोन मुले आहेत. जुनैद व इरा ही रीना दत्ता व आमिर खानची मुले आहे. मात्र, रीना व आमिर खान यांनी २००२ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आमिर खानने लोकप्रिय दिग्दर्शिका किरण रावबरोबर २००५ मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र, २०२१ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांना एक मुलगा आहे. त्याचे नाव आझाद असे आहे. घटस्फोट झाल्यानंतरही आमिर खानचे त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नींबरोबर म्हणजे रीना दत्ता व किरण राव यांच्याबरोबर चांगली मैत्री असल्याचे पाहायला मिळते.