Premium

“मला कॉलर धरून बाहेर काढलं…,” नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितला बॉलीवूडमध्ये काम करताना आलेला धक्कादायक अनुभव, म्हणाला…

त्याला सेटवर वाईट वागणूकही मिळायची असा खुलासा आता त्याने केला आहे.

nawazuddin-siddiqui

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलीवुड मधील लोकप्रिय अभिनेतांपैकी एक आहे. आज त्याने जे यश संपादन केलं आहे ते मिळवताना त्याला बराच स्ट्रगल करावा लागला. सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्याला सेटवर वाईट वागणूकही मिळाली. याचा खुलासा आता त्याने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवाजुद्दीन सिद्दीकीने आतापर्यंत अभिनेता ते खलनायक अशा विविध भूमिका साकारल्या आहेत. आज तो बॉलीवूड मधील एक टॅलेंटेड अभिनेता म्हणून ओळखला जात असला तरीही कोणे एके काळी त्याला सेटवर कॉलर धरून बाजूला केलं गेलं. नुकतीच त्याने ‘बीबीसी हिंदी’ला एक मुलाखत दिली आणि या सगळ्याबद्दल त्या मुलाखतीत त्याने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : “महिला व्हॅनिटी व्हॅनमध्ये…” नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितला स्त्री पात्र साकारण्याचा अनुभव

तो म्हणाला, “अनेक चित्रपटांच्या सेटवर कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी बसून जेवण करतात. ज्युनियर आर्टिस्ट वेगळ्या ठिकाणी, सहाय्यक कलाकारांची स्वतःची जागा असते आणि मुख्य कलाकारही आणखीन वेगळ्या जागी बसून जेवण करतात. तर अशीही काही प्रॉडक्शन्स आहेत जिथे सर्वजण एकत्र जेवतात, यात यशराज फिल्म्सचा समावेश आहे, परंतु अनेक प्रॉडक्शन हाऊसेस जेवणाच्या ठिकाणांची विभागणी करतात. मी अनेकदा मुख्य कलाकार जिथे जेवतात तिथे जेवण्याचा प्रयत्न करायचो. पण माझी कॉलर धरून मला तेथून हाकललं जायचं. मला राग यायचा. सर्व कलाकारांना समान मान द्यायला हवा असं मला वाटायचं.”

हेही वाचा : “सलमान आणि शाहरुख दोघेही…” नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितला अभिनेत्यांबरोबर काम करण्याचा अनुभव

दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकी नुकताच ‘जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटात झळकला. या चित्रपटात त्याच्याबरोबर नेहा शर्मा, संजय मिश्रा, महाक्षय चक्रवर्ती यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकलेला नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 20:04 IST
Next Story
नवाजुद्दीनच्या पत्नीने केला ‘मिस्ट्री मॅन’बद्दल खुलासा; ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत म्हणाली, “आमचं नातं मैत्रीपेक्षा…”