scorecardresearch

“रेल्वे स्टेशनवरील पाणी बिसलेरीपेक्षा…” सोनू सूदने शेअर केला मुंबई लोकलचा अनुभव

सोनू सूद मूळचा पंजाबी असून त्याने आपले शिक्षण नागपूर येथून केले आहे.

“रेल्वे स्टेशनवरील पाणी बिसलेरीपेक्षा…” सोनू सूदने शेअर केला मुंबई लोकलचा अनुभव
actor shared mumbai local experience

गरजूंना मदत करण्यात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सर्वात पुढे असतो. सोनू सूदने कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून हजारो लोकांना मदत केली आहे. त्याच्या या गुणामुळे त्याचे असंख्य चाहते आहेत. आंध्र प्रदेशात त्याचे मंदिर बांधण्यात आले आहे. सोनू सूद मदत करताना कोणाचीही जात, धर्म किंवा जन्मस्थळ बघत नाही. आज सोनू सूद सामाजिक कार्यामध्ये हातभार लावत असला तरी त्याचा स्वतःचा संघर्ष काही कमी नाही. मॉडेलिंगपासून त्याने आपल्या करियरची सुरवात केली.

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर…” तेजस्विनी पंडितच्या नव्या वेबसीरिजची पहिली झलक समोर

सोनू सूद आज जर मोठा अभिनेता असला तरी कधीकाळी तोदेखील सर्वसामान्य मुंबईकरांसारखे आयुष्य जगत होता. त्याने नुकताच एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे ज्यात तो मुंबईच्या लोकलने प्रवास करत आहे. व्हिडिओची सुरवात सोनू सूद बोईसर रेल्वे स्टेशनवर झोपलेला दाखवण्यात आला आहे. रेल्वेच्या आवाजने तो उठतो ट्रेन पकडतो. व्हिडिओमध्ये सोनूने रेल्वेमधील पूर्ण प्रवास शेअर केला आहे. जिथे तो सामान्य मुंबईकरासारखा रेल्वेच्या दरवाज्यात उभा आहे, स्टेशनवर असणाऱ्या नळातून पाणी पित आहे. रात्री १० वाजता चित्रीकरण संपवून घरी जाताना व्हिडीओ तयार केला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत. त्याच्या या छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करत आहेत. ‘सोनूचे पाय अजूनही जमिनीवर आहेत’ असं काहींचं म्हणणं आहे. मात्र काहींनी त्याच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली आहे ती म्हणजे त्याने स्टेशनवरील पाण्याचे कौतुक केले आहे यावरून लोकांनी त्याच्यावर टीका केली आहे. तर काहींनी म्हंटल आहे ‘एकच हृदय आहे आणखीन कितीवेळा जिंकणार आहात’.

सोनू सूद मूळचा पंजाबी असून त्याने आपले शिक्षण नागपूर येथून केले आहे. तामिळ चित्रपटातून त्याने अभिनय करण्यास सुरवात केली. ‘जोधा अकबर’, ‘युवा’, ‘आशिक बनाया आपने, यांसारख्या हिंदी चित्रपटात त्याने काम केले आहे. नकारात्मक भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. २०१६ साली त्याने ‘शक्ती सागर’ नावाची निर्मिती संस्था सुरु केली.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या