actress kareena kapoor younger son jeh enjoying football with nannies spg 93 | करीनाच्या धाकट्या लेकाला फुटबॉलची आवड; खेळता खेळतामध्येच... | Loksatta

करीनाच्या धाकट्या लेकाला फुटबॉलची आवड; खेळता खेळतामध्येच…

खेळताना त्याला दुखापत होऊ नये यासाठी तिने असे केले असावे.

करीनाच्या धाकट्या लेकाला फुटबॉलची आवड; खेळता खेळतामध्येच…
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

बॉलिवूडमधील जोड्या कायमच चर्चेत असतात. रितेश जिनिलिया, रणबीर आलिया, सैफ करीना, या जोड्यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असते. सैफ करीना हे जोडपे सोशल मीडियावर सक्रिय असते. आज ते दोन मुलांचे पालक आहेत. सैफ अली खान तैमूरची काळजी घेतो तर करीना धाकट्या मुलाची काळजी घेते. सैफ आणि तैमूर नुकतेच मालदीवला जाऊन आले होते. तर करीना जेहला घेऊन लंडनला चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी घेऊन गेली होती.

तैमूरप्रमाणे जेहसुद्धा चर्चेत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तो घराबाहेर फुटबॉल खेळताना दिसत आहे. फुटबॉल खेळण्यासाठी त्याने पांढऱ्या रंगाचे शूज, निळा टी शर्ट आणि शॉर्ट्स असा वेष परिधान केला होता. व्हिडीओमध्ये दिसत आहे जेह उत्साहात खेळत आहे. मात्र त्याचा सांभाळ करणारी नॅनी मध्ये आली आणि तिने जेहच हात पकडून त्याला घरात नेले. खेळताना त्याला दुखापत होऊ नये यासाठी तिने असे केले असावे.

‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून डॉ. रोहित शिंदे बाहेर; इतर स्पर्धक झाले भावुक

सैफ करीना आपल्या मुलांच्याबाबतीत खूपच जागरूक आहेत. सैफ अली खान मध्यंतरी एका मुलाखतीत म्हणाला होता, ‘जहांगीरच्या जन्मानंतर तैमूर खरंच मोठा झाला आहे. त्या दोघांमध्ये चांगले बॉण्डिंग आहे. तैमूर आपल्या धाकट्या भावाच्याबाबतीत अत्यंत संयमशील आणि संरक्षणात्मकदेखील आहे. तसेच तो म्हणाला होता की करीना आम्हा सगळ्यांची जास्त काळजी घेते.

‘टशन’ चित्रपटापासून सैफ करीनाच्या प्रेमप्रकरणाला सुरवात झाली. प्रेमाचे रूपांतर खरे लग्नात झाले. १६ ऑक्टोबर २०१२ साली दोघांनी लग्नगाठ बांधली. दोन मुलांचे ते आईवडील आहेत.करीना आणि सैफने २०१६ मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या मुलाला तैमूरला जन्म दिला तर मागच्या वर्षी फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाला म्हणजे जहांगीरला जन्म दिला.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 12:48 IST
Next Story
‘बेल बॉटम’ चित्रपटावर पाकिस्तानी चाहत्याचा आक्षेप; खुद्द अक्षय कुमारने दिलं स्पष्ट उत्तर