अभिनेत्री समीरा रेड्डी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समीरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना दिसते. समीराने आई झाल्यानंतर तिने अभिनयाकडे पाठ फिरवली. ती सध्या तिच्या संपूर्ण कुटुंबाकडे लक्ष देण्यात व्यस्त आहे. मदर्स डे निमित्त समीराने आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सगळीकडे तिच्या व्हिडीओचीच चर्चा सुरु आहे.
हेही वाचा- परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यासाठी खास थीमचे आयोजन; ‘असा’ असेल दोघांचा लूक
मदर्स डे निमित्त समीराने शुभेछच्छा देणारा एक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने कॅप्शनही दिले आहे. ‘सगळ्या सुंदर मातांनो आपण जसे आहोत तसे परिपूर्ण आहोत’ या व्हिडीओत बाळांतपणानंतर तिचे वाढलेले वजन स्प्ष्ट दिसत आहे. मात्र, वाढलेले वजन न लपवता ती बिंधास्तपणे फोटोशूट करताना दिसत आहे.
दरम्यान, समीराने २००२ मध्ये सोहेल खान सोबत ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. समीराने हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. समीराने २०१४ मध्ये बिजनेसमॅन अक्षय वर्देशी लग्न केले. त्यांच्या मुलाचे नाव हे हंस आणि मुलीचे नाव नायरा आहे.