बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल म्हणजे अजय देवगण आणि काजोल. पडद्यावर दिसणाऱ्या काजोल अजयच्या केमिस्ट्रीपेक्षाही खऱ्या आयुष्यात दोघांचे नात अधिक मजबूत आहे. वडिलांच्या विरोधात जाऊन काजोलने अजय देवगणसोबत लग्न केले असले तरी आज मात्र तिला तिच्या निर्णयाचा अभिमान आहे. काजोल आणि अजय देवगणच्या लग्नाला २३ वर्षे झाली आहेत. लग्नानतंर काजोलने सिनेसृष्टीतून ब्रेक घेत कौटुंबीक आयुष्याला जास्त महत्त्व दिले.
काजोल आणि अजय देवगणने १९९९ मध्ये लग्न केले होते. लग्नापूर्वी दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले होते. काजोल आणि अजय देवगण यांनी ‘इश्क’, ‘प्यार तो होना ही था’ यासह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे, परंतु तिच्या आणि शाहरुख खानच्या जोडीला प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली. काजोल आणि शाहरुखने बाजीगर, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.
मात्र, एकेकाळी अजयला काजोल आणि शाहरुखच्या केमिस्ट्रीचा हेवा वाटत होता आणि त्यामुळेच त्याने काजोलला शाहरुखसोबत काम करण्यास नकार दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. मसाला डॉटकॉमच्या रिपोर्टनुसार, “लोक काजोल आणि अजयच्या नात्याबद्दल कमी आणि काजोल आणि शाहरुखच्या मैत्रीबद्दल जास्त बोलायचे. अजयला ही गोष्ट अजिबात आवडली नाही. त्यामुळे त्याने काजोलला शाहरुखबरोबर काम करण्यास मनाई केली होती.
हेही वाचा- Video: श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंडबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, जाणून घ्या कोण आहे तो?
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखला अजयने काजोलला त्याच्याबरोबर काम करण्यास मनाई केली आहे का, असा प्रश्न त्याला विचारला होता. त्यावर शाहरुख म्हणालेला, “अजयने अशी कोणतीही अट घातली आहे की नाही हे मला माहीत नाही. अजयने तिला नकार दिल्याने काजोल माझ्यासोबत काम करणार नसेल, तर मी या निर्णयाचा आदर करेन. पण असे झाले आहे असे मला वाटत नाही. हे जरा विचित्र आहे. गौरी जर अभिनेत्री असती तर मी तिला कधीच सांगणार नाही की तुला कोणाबरोबर काम करायचे आहे आणि कोणाबरोबर नाही.”
काजोलच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर काजोल आगामी ‘द ट्रायल’ वेब सीरिजमध्ये पहिल्यांदाच वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘द गुड वाइफ’ या अमेरिकन सीरिजचं हिंदी रूपांतरीत ‘द ट्रायल’ सीरिज आहे. अजय देवगण, दीपक धर, मृणालिनी जैन व राजेश चड्ढा यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे.