तब्बू, करिना कपूर व क्रिती सेनॉन अभिनीत ‘क्रू’ चित्रपट शुक्रवारी (२९ मार्च) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. दणक्यात सुरुवात झालेल्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. आता आलिया भट्टनं या चित्रपटातील अभिनेत्रींचं कौतुक करीत एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आलिया भट्टनं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर करीत ‘क्रू’ चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे. “या ‘क्रू’नं बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. रिहा कपूर, एकता कपूर, तब्बू, करिना कपूर व क्रिती सेनॉन या पडद्यावरील आणि पडद्यामागील महिलांचं अभिनंदन!” अशा शब्दांत आलिया भट्टनं संपूर्ण क्रूचं कौतुक केलं. आलियाची स्टोरी रिपोस्ट करीत क्रिती सनॉननं “आलिया, थॅंक्स लव्ह!”, अशी कॅप्शन दिली.

विशेष म्हणजे क्रिती आणि आलिया यांना गेल्या वर्षी ‘मिमी’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’मधील त्यांच्या परफॉर्मन्ससाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच, आलियानं असंही कबूल केलंय की, तिला करिनाचा धाक वाटतो. करिना आणि क्रितीनं गेल्या वर्षी ‘कॉफी विथ करण सीझन ७’मध्ये सहभाग घेतला होता.

हेही वाचा… ‘12th fail’ फेम विक्रांत मेस्सीने लाडक्या लेकासाठी काढला खास टॅटू; फोटो शेअर करत म्हणाला…

‘क्रू’नं पहिल्या दिवशी जगभरात २०.०७ कोटींची कमाई करून, आलियाच्या २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’च्या ओपनिंगला मागे टाकलं आहे. तर, भारतात ‘क्रू’नं पहिल्या दिवशी ८.७५ कोटी रुपये कमावले आहेत.

इन्स्टाग्राम स्टोरीजवर ‘क्रू’च्या टीमला शुभेच्छा देणारी फक्त आलिया भट्टच नाही, तर भूमी पेडणेकर व हुमा कुरेशी यांनीही या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आणि कौतुक केले.

हेही वाचा… “आपल्या आयुष्यातून निघून गेलेली माणसं…”, कुशल बद्रिकेची भावुक पोस्ट; नेटकरी म्हणाले, “चला हवा येऊ द्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘क्रू’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर राजेश ए कृष्णन दिग्दर्शित ‘क्रू’ चित्रपटात करीना कपूर, तब्बू व क्रिती सेनॉन एअर होस्टेसची भूमिका साकारली आहे. बालाजी टेलिफिल्म्स आणि अनिल कपूर फिल्म अॅण्ड कम्युनिकेशन नेटवर्क बॅनरखाली बनलेला हा चित्रपट २९ मार्चला प्रदर्शित झाला.