सत्तर ऐंशीच्या दशकात मोठा पडदा पूर्णपणे व्यापला होता तो अभिनेता साक्षात अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन गेली ५ दशकं बॉलीवूडमध्ये कार्यरत आहेत. आपल्या अभिनयाने त्यांनी देशातीलच नव्हे तर परदेशातील लोकांची मन जिंकली आहेत. अमिताभ बच्चन यांच्यावर प्रत्येक पिढीतील लोकांनी प्रेम केले आहे. या वयातदेखील त्यांच्या कामाच्या पद्धतीने इतर कलाकार, प्रेक्षक थक्क होतात. आज अमिताभ बच्चन यांचे चित्रपट रोज कोणत्या ना कोणत्या वाहिनीवर सुरु असतात .मात्र त्यांचे काही गाजलेले चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहेत. एका महोत्सवामध्ये हे चित्रपट दाखवले जाणार आहेत.

येत्या ८ ऑक्टोबरपासून ते ११ ऑक्टोबरपर्यंत ‘बच्चन बॅक टू बॅक’ या नावाने चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ऑक्टोबर या दिवशी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असतो. यावर्षी ते वयाच्या ८० वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्ताने फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने पीव्हीआर सिनेमा बरोबर भागीदारीत या अनोख्या महोत्सवाची घोषणा केली आहे. हा महोत्सव २२ चित्रपटगृह ज्यात ११ गाजलेले चित्रपट आणि ३० स्क्रीनसह १७ भारतीय शहरांमध्ये होणार आहे.

“माझ्या आईचा विरोध होता कारण…” अपूर्वा नेमळेकर झाली भावूक

या महोत्सवामध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद अहमदाबाद, सुरत, बडोदा, रायपूर, कानपूर, कोल्हापूर, प्रयागराज आणि इंदूर या शहरांचा समावेश असेल तर डॉन’, ‘काला पत्थर’, ‘कालिया’, ‘कभी कभी’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘नमक हलाल’, ‘अभिमान’, ‘दीवार’, ‘मिली’, ‘सत्ते पे सत्ता’ आणि ‘सत्ते पे सत्ता’, चुपके’.’चुपके’सारखे चित्रपट दाखवले जाणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना हे चित्रपट पुन्हा पाहायचे असतील तर आपल्या आसपास असणाऱ्या पीव्हीआर चित्रपटगृहात जाऊन ४०० रुपये भरून हे चित्रपट बघण्यासाठीचा पास मिळू शकतो. तसेच हे पासेस तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतील. याशिवाय मुंबईतील जुहू येथील पीव्हीआर सिनेमागृहात अमिताभ बच्चन यांच्या संस्मरणीय वस्तूंचे विशेष प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे.