Anant Ambani Wedding Gifted 2 core Watch: अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा शाही लग्नसोहळा १२ जुलै रोजी पार पडला. या लग्नसोहळ्याला अनेक प्रसिद्ध कलाकारांनी आणि बड्या मंडळींनी हजेरी लावली होती. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आधी वरात मग लग्न आणि मुलीची पाठवणी असा समारंभपूर्वक सोहळा पार पडला.

या सोहळ्यात रणवीर सिंग, शाहरुख खान, सलमान खान, अनन्या पांडे, आलिया भ्ट्ट, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, जान्हवी कपूर, माधुरी दिक्षित, अनिल कपूर, अजय देवगन असे अनेक कलाकार सामील झाले होते.

हेही वाचा… Anant Ambani Wedding: अनंत-राधिकाच्या लग्नात ‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडने केला खास परफॉर्मन्स; मराठी गाण्यावर थिरकले बॉलीवूड कलाकार

अनंत अंबानीच्या या भव्य विवाहसोहळ्यात पाहुण्यांची खास सोय करून दिली होती. त्यांना कशाचीच कमी पडू नये याची व्यवस्थित काळजी घेतली गेली होती. या लग्नसोहळ्यात काही कलाकारांना आणि मंडळींना एक खास भेटवस्तू (रिटर्न गिफ्ट) देण्यात आली. या भेटवस्तूची किंमत कोटींमध्ये आहे.

अनंत अंबानीने दिलेल्या २ कोटींची भेटवस्तू (Anant Ambani Gifted 2 Crore Watch)

अनंत-राधिकाच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांना काही गिफ्ट हॅंपर्स देण्यात आले. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या गिफ्ट हॅंपरमध्ये प्रत्येकाला ‘Audemars Piguet’ या कंपनीचे घड्याळ दिलं असून त्याची किंमत तब्बल २ कोटी रुपये इतकी आहे. हा व्हिडीओ ‘theindianhorology’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत अनेकांनी हे घड्याळ घातलेलं दिसतंय. बॉलीवूडचा किंग खान शाहरुख तसंच रणवीर सिंगनेदेखील हे घड्याळ घातल्याचं पाहायला मिळतंय. “अनंत अंबानीने त्याच्या मित्रांना खास घड्याळ गिफ्ट केलं” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं गेलंय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं, “म्हणूनच एवढ्या उत्साहात या लग्नात सगळे नाचत होते.”

घड्याळाचे फिचर्स (Watch Features)

‘Audemars Piguet’ ब्रॅंडच्या या घड्याळाच्या डायलचा रंग गुलाबी आणि सोनेरी रंगाचा असून या घड्याळात दिवस, तारीख, महिना, लीप वर्ष तसंच तास आणि मिनिटे दर्शविणारे फिचर्स आहेत. या घड्याळ्याचं ब्रेसलेट १८ कॅरेटच्या सोन्याचं आहे आणि हे घड्याळ वॉटर रेसिस्टंटदेखील आहे.

अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा लग्नसोहळा (Anant Ambani Radhika Merchant Wedding)

अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. लग्नाआधी मामेरू विधी, संगीत सोहळा, शिव शक्ती पूजा, हळद, गृह शांती, मेहंदी अशा अनेक कार्यक्रमांची आणि विधींची सांगता झाली. या भव्य लग्नसोहळ्यासाठी अंबानी कुटुंबाने भारतासह परदेशातील नामवंत मंडळींना आमंत्रित केलं होतं.

हेही वाचा… Anant Ambani Wedding: “चोली के पिछे क्या है…”, अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात माधुरी दिक्षितच्या हटके डान्सने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या शाही लग्नसोहळ्यानंतर काल १३ जुलै रोजी ‘शुभ आशीर्वाद’ सोहळा पार पडला. या सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती दर्शविली होती. तर आज १४ जुलै रोजी ‘मंगल उत्सव’ म्हणजेच रिसेप्शन पार पडणार आहे.