बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत कायम चर्चेत असते. बॉलिवूडवर आगपाखड असो किंवा राजकीय भूमिका मांडणं असो कंगना तिचे विचार अगदी स्पष्टपणे मांडत असते. सध्या ट्विटरची मालकी एलॉन मस्क यांच्याकडे असल्याने कंगनाचं ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू होणार का अशी चर्चा होत आहे. नुकतंच कंगनाने ‘आज तक’च्या वृत्तवाहिनीच्या ‘पंचायत आजतक’ या कार्यक्रमात हजेरी लावली.

या मुलाखतीमध्ये कंगना नेहमीप्रमाणे तिच्या खरमरीत शैलीत उत्तरं दिली. ट्विटर, बॉलिवूड, नेपोटीजम, साऊथचे चित्रपट, राजकारण अशा विविध गोष्टींवर कंगनाने भाष्य केलं आहे. इतकंच नाही तर “मी ट्विटरवर परत आली तर खूप खळबळ होईल” असंही कंगना या कार्यक्रमात म्हणाली. कंगनाने या मुलाखतीमध्ये तिचे राजनैतिक संबंध आणि कुटुंब याविषयी खुलासा केला. शिवाय हे सांगताना तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खूप प्रशंसा केली.

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’चे दिग्दर्शक ओम राऊत आणि रणवीर सिंग एकत्र येणार? चर्चा होतीये एका मोठ्या चित्रपटाची

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कंगना म्हणाली, “माझं कुटुंब हे राजकीय कुटुंब होतं. माझे आजोबा कॉंग्रेसमध्ये होते, माझे वडीलही याच क्षेत्रात होते. मोदीजी आल्यानंतर आमच्या कुटुंबात एक मोठं परिवर्तन झालं. माझ्या वडिलांनीच प्रथम मला मोदीजी यांच्या कार्याबद्दल माहिती दिली होती. आता तर माझे वडील रात्री झोपताना ‘जय मोदी’ आणि सकाळी उठताना ‘जय योगी’ असाच जयघोष करतात. आज प्रत्येक देशवासीयाला आपल्या देशावर गर्व आहे. हिमाचलमध्ये कुणालाही विचारा मोदीजी हे त्यांना त्यांच्या घरातील सदस्यच वाटतात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंगनाच्या अशा वक्तव्यामुळे ती लवकरच राजकारणात प्रवेश करू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. कंगनाच्या या व्यक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. कंगना इंदिरा गांधी यांच्यावर बेतलेल्या चारित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. शिवाय या चित्रपटाचं दिग्दर्शनही तीच करणार आहे. तिचा फर्स्ट लूक लोकांना चांगलाच आवडला आहे आणि तिच्या या चित्रपटासाठी सगळेच उत्सुक आहेत.