Ileana D’cruz Welcomes Second Baby: बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ दुसऱ्यांदा आई झाली आहे. पहिला मुलगा दोन वर्षांचा झाल्यानंतर आता तिने तिच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून दुसऱ्या मुलाच्या जन्माची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली. इतकंच नाही तर तिने बाळाची पहिली झलकही दाखवली आहे. बाळाचं नाव काय ठेवलं, तेही इलियानाने सांगितलं.
इलियाना डिक्रुझचं चौकोनी कुटुंब पूर्ण झालं आहे. ती व तिचा जोडीदार मायकल डोलन पुन्हा आई-बाबा झाले आहेत. इलियानाने १ ऑगस्ट २०२३ रोजी तिच्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं होतं. तिच्या मुलाचं नाव कोआ फीनिक्स डोलन ठेवलंय. मुलाच्या जन्मानंतर ती चित्रपटांपासून दूर आहे. बाळाच्या संगोपनात व्यग्र असलेल्या इलियानाने नवीन वर्षानिमित्त एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओतून तिने ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याची गुड न्यूज दिली होती.
इलियानाने १९ जून २०२५ रोजी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. तिने इन्स्टाग्रामवर बाळाचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्याचं नावही जाहीर केलं आहे.
इलियाना डिक्रुझच्या दुसऱ्या मुलाचं नाव काय?
इलियानाने धाकट्या मुलाचं नाव ‘कीनू राफे डोलन’ (Keanu Rafe Dolan) असं ठेवलं आहे. त्याचा जन्म १९ जून रोजी झाला.
इलियानाने ही आनंदाची बातमी दिल्यावर चाहत्यांनी व सेलिब्रिटींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. प्रियांका चोप्रा, अथिया शेट्टी, विद्या बालन, मलायका अरोरा, करणवीर शर्मा, सोफी चौधरी, रिद्धिमा तिवारी, डब्बू मलिक, अंजना सुखानी, जहीर इक्बालसह अनेकांनी इलियानाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तिच्या लाडक्या मुलावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
इलियाना डिक्रुझचा पती कोण?
इलियाना डिक्रुजच्या पतीचे नाव मायकल डोलन आहे. तिने २०२३ मध्ये त्याच्याशी लग्न केलं आणि त्याच वर्षी ती आई झाली. तिने लग्नाची बातमी लपवून ठेवल्याने लग्न न करताच इलियाना आई झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता ती दुसऱ्यांदा आई झाली असून तिचं चौकोनी कुटुंब पूर्ण झालं आहे.
इलियाना डिक्रुझच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती अखेरची ‘दो और दो प्यार’ या चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट २०२४ मध्ये आला होता. यात विद्या बालन व प्रतीक गांधी यांच्याबरोबर इलियानाने महत्त्वाची भूमिका साकारली होती.