अभिषेक बच्चनचं वडील अमिताभ बच्चन यांच्यावर किती प्रेम आहे हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. एखादी संधी मिळाली की तो वडिलांबाबत भरभरून बोलताना दिसतो. यावरूनच तो वडिलांचा किती आदर करतो हे दिसून येतं. ‘केस तो बनता है’ या शोमध्ये अभिषेक बच्चनने हजेरी लावली होती. कॉमेडी ड्रामा असलेल्या या शोमध्ये वडिलांबाबत जे काही बोललं गेलं ते अभिषेकला आवडलं नाही. चक्क शो सुरु असताना तो तिथून निघून गेला.

आणखी वाचा – डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला अन् रणबीर कपूरने होणाऱ्या बाळासाठी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या

नेमकं प्रकरण काय?
रितेश देशमुख, परितोष त्रिपाठी व कुशा कपिलाचा ‘केस तो बनता है’ शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेकबरोबर सगळेच मजा-मस्ती करताना दिसत आहेत. परितोष आपल्या विनोदी शैलीने सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हे सगळं सुरु असताना अभिषेकला राग अनावर होतो आणि तो शोमधून निघून जात असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.

पाहा व्हिडीओ

अभिषेक म्हणतो, “हे खूप जास्त होत आहे. माझ्याबद्दल बोला पण माझ्या पालकांना मध्ये घेऊ नका. तसेच वडिलांना इथे मध्येच का आणायचं? ते माझे वडील आहेत. त्यांचा आपण आदर केला पाहिजे. विनोदाच्या नावाखाली आपण सध्या हवं ते करतो. पण मी मुर्ख नाही.” असं म्हणत अभिषेक शो सोडून निघून जातो.

आणखी वाचा – Photos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का? अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर अभिषेकचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत. हा तर प्रँक असणार, अभिषेकने चित्रपटांमध्ये इतका चांगला अभिनय केला असता तर बरं झालं असतं, हे सगळं खोटं आहे अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. हे प्रकरण नेमकं काय आहे हे ‘केस तो बनता है’चा पुढील भाग प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.