अभिनेत्री दिशा पटानी ही तिच्या चित्रपटांमुळे तसेच तिच्या स्टाइलमुळेदेखील ओळखली जाते. अभिनेत्रीने ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातील दिशाच्या भूमिकेचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. त्यानंतर तिने ‘कुंग फू योगा’, ‘बागी २’, ‘भारत, ‘मलांग’, ‘बागी ३’, ‘राधे’, ‘एक व्हिलन रिटर्न्स’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘कंगुवा’ अशा चित्रपटांत काम करत दिशा पटानीने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्रीच्या स्टाइलमुळेदेखील ती नेहमीच चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर ती अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठा आहे.
आता मात्र दिशा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. इन्स्टंट बॉलीवूडने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिशा बास्केटबॉल खेळताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. तिच्याबरोबर इतर खेळाडूदेखील बास्केटबॉल कोर्टमध्ये दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये दिशाबरोबर अभिनेता रणविजय सिंघदेखील बास्केटबॉल खेळताना दिसत आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी दिशाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले आहे. “ब्युटी विथ टॅलेंट”, “दिशा छान खेळलीस” अशा कमेंट केल्या आहेत, तर काहींनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.


दिशा पटानी लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. वेलकम या फ्रँचायजीचा हा तिसरा चित्रपट आहे. दिशाबरोबरच, अक्षय कुमार, रवीना टंडन, परेश रावल, सुनील शेट्टी, बॉबी देओल, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, जॉनी लिव्हर, राजपाल यादव, संजय दत्त, जॅकलीन फर्नांडिस, अनिल कपूर, लारा दत्ता, कृष्णा अभिषेक असे अनेक कलाकार दिसणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच ‘वेलकम टू द जंगल’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या टीझरमध्ये हे कलाकार हटके अंदाजात पाहायला मिळाले होते. ‘वेलकम टू द जंगल’ हे गाणं वेगळ्या अंदाजात पाहायला मिळाले होते. तसेच, टीझरच्या शेवटी बॉम्ब फुटल्याचे पाहायला मिळाले. अहमद खान दिग्दर्शित ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपट पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळाले.
आता या चित्रपटातील दिशाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.