फुक्रे ३’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. २८ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घातला आहे. अजूनही चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाची क्रेझ पहायला मिळते. जगभरात या चित्रपटाने १०० कोटींची कमाई केली आहे. कमाईमध्ये या चित्रपटाने द वॅक्सीन वॉर चित्रपटालाही मागे टाकले आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.

हेही वाचा- “जो कुणी माझा फोन परत करील त्याला…”; उर्वशी रौतेलाची घोषणा; पोस्ट शेअर करीत म्हणाली…

चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. अमेझॉन प्राईमवर हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी याबाबतची घोषणाही केली आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘फुक्रे ३’ चित्रपटात रिचा चढ्ढा, पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंग आणि पंकज त्रिपाठी यांची मुख्य भूमिका आहे. ‘फुकरे’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०१७ साली या चित्रपटाचा दुसरा भाग ‘फुकरे २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. ‘फुक्रे ३’ चित्रपटाचे दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा यांनी केलं आहे. यापूर्वीच्या दोन्ही भागांचेसुद्धा दिग्दर्शन त्यांनीच केले आहेत. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेन्मेटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.