बॉलीवूडमधील कलाकारांनी आपल्या कामगिरीने भारतात आणि परदेशांतही नाव कमावले आहे. त्यासाठी त्यांचे कौतुकही होत असते. सुपरस्टार अमिताभ बच्चन, किंग शाहरूख खान, लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट, तसेच चित्रपट निर्माता करण जोहर यांची नावे भारतीय मनोरंजन उद्योगातील ‘IE 100- द मोस्ट पॉवरफुल इंडियन 2024’ च्या यादीत समाविष्ट झाली आहेत.

पाच वर्षांनंतर वयाच्या ५८व्या वर्षी तीन चित्रपट करीत शाहरुख खानने पुनरागमन केले. या तीनही चित्रपटांनी जागतिक बॉक्स ऑफिसवर २,६०० कोटींहून अधिक कमाई केली. कोरोनाच्या महामारीनंतर ‘पठाण’ चित्रपटातून कमबॅक करीत शाहरूखने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तर नवीन बेंचमार्क सेट करीत, शाहरुखचा ‘जवान’ आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला.

Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
first Indian woman who joined Unicorn Club
‘अब्ज डॉलर’ कंपनी चालवणारी ‘ही’ भारतीय महिला Unicorn Club मध्ये झाली सामील! कोण आहे जाणून घ्या
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

शाहरुखच्या तिसऱ्या चित्रपटाने म्हणजेच ‘डंकी’ने एवढी कमाई केली नसली तरी अगदी कमी प्रमोशनमध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या तिन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवीत नवा विक्रम केला.

हेही वाचा… आमिर खानने ‘असा’ घेतला होता दुसऱ्या पत्नीशी घटस्फोट; किरण राव म्हणाली, “आम्हाला आझादला…”

आलिया भट्ट आता अभिनेत्रीच नव्हे, तर निर्माती व उद्योजिकादेखील आहे. आलियाने २०२३ मध्ये ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच ‘हार्ट ऑफ स्टोन’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटामुळे जागतिक स्तरावर तिने प्रसिद्धीही मिळवली. ‘गंगूबाई काठियावाडी’मधील भूमिकेसाठी तिला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या भारतीय कलाकारांपैकी एक असलेली आलिया गुच्चीची ग्लोबल ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनली आणि सोल, मिलानमधील ब्रॅण्डच्या फॅशन शोमध्ये सहभागीसुद्धा झाली. आई होणाऱ्या मातांसाठी रिलायन्स रिटेलने तिचा ब्रॅण्ड ‘एड-ए-मम्मा’मधील ५१ टक्के भांडवलही विकत घेतले.

हेही वाचा… १० वर्षांच्या डेटिंगनंतर तापसी पन्नू बांधणार लग्नगाठ; अभिनेत्री म्हणाली होती, “अत्यंत साधं…”

बॉलीवूडमधील ५१ वर्षांच्या कारकिर्दीनंतर चित्रपट निर्माता करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. दिग्दर्शक, लेखक, निर्माता, टॅलेंट शोचा परीक्षक आणि चॅट शोचा होस्ट अशा अनेक कामगिरी बजावलेला करण जाहिरात क्षेत्रातही उतरला आहे. करणचा ओटीटीवरील ‘कॉफी विथ करण’ लोकप्रिय ठरला.

करणचे धर्मा प्रॉडक्शन आता वेगळ्या जॉनर्सवर काम करीत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा अभिनीत ‘योद्धा’, ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही’; ज्यात राजकुमार राव आणि जान्हवी कपूर प्रमुख भूमिकांत आहेत. तसेच आलिया भट्टचा ‘जेल ब्रेक’ ड्रामा, ‘जिगरा’ यांसारख्या इतर जॉनर्सचे चित्रपट धर्मा प्रॉडक्शन घेऊन येत आहे.

हेही वाचा… लंडनमध्ये लेक वामिकासह विराट कोहली दिसला एकत्र, फोटो झाला व्हायरल; नेटकरी म्हणाले, “अनुष्का…”

दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन बॉलीवूड सिनेसृष्टीला लाभलेली एक पर्वणी आहे. ८१ वर्षांचा ऑन स्क्रीन अनुभव असलेले अमिताभ बच्चन पाच दशकांत २०० हून अधिक चित्रपटांमध्ये दिसले. अभिनेता, गेम शो होस्ट, ब्रॅण्ड मेसेंजर, सोशल मीडिया आयकॉन म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन प्रत्येक पिढीसाठी पुन्हा नव्याने काम करीत आहेत.

२०२३ च्या सेलिब्रिटी ब्रॅण्ड व्हॅल्युएशन अहवालात अमिताभ बच्चन यांची ब्रॅण्ड व्हॅल्यू $७९ दशलक्ष आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) च्या उद्घाटनापूर्वी अमिताभ बच्चन यांनी ‘माझी मुंबई’ नावाची टीम जाहीर केली आहे. या कालावधीत मेगास्टारने त्यांच्या चाहत्यांशी वैयक्तिक संबंध निर्माण केले आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या कामाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटात बच्चन दिसणार आहेत. रजनीकांत अभिनीत ‘वेट्टायन’ या तमिळ चित्रपटातही अमिताभ बच्चन झळकणार आहेत.