बॉलिवूडच्या ग्लॅमर दुनियेपासून दूर झालेली अभिनेत्री सना खान सोशल मीडियावर मात्र नेहमीच चर्चेत असते. बिग बॉसमध्ये दिसलेल्या सना खानने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मात्र २०२० मध्ये इस्लामसाठी तिने चित्रपटसृष्टी आणि अभिनय क्षेत्राला कायमचा रामराम ठोकला. आता सना पती अनस सैय्यदबरोबर वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. अशात तिने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरत असून त्यावरून सना गरोदर असल्याचा अंदाज नेटकरी लावताना दिसत आहेत.

सना खान नुकतीच तिचा पती अनस सैय्यदबरोबर उमराहसाठी गेली होती. त्यावेळीचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोमध्ये ते दोघंही सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. तर दुसरा फोटो फ्लाइटमध्ये क्लिक केलेला दिसत आहे. हे फोटो शेअर करताना सनानं ही उमराह ट्रीप तिच्यासाठी खास असल्याचं म्हटलं आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “हा उमराह काही कारणाने खास आहे आणि ते खास कारणही लवकरच तुमच्या सर्वांसह शेअर करणार आहे.”

आणखी वाचा- जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या रेस्तराँमध्ये सना खानने घेतला २४ कॅरेट Gold Tea चा आस्वाद; किंमत वाचून थक्क व्हाल

सनाच्या या पोस्टवर चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. नेटकऱ्यांनी तर सना लवकरच आई होणार असल्याचाही अंदाज बांधला आहे आणि तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलं, “अल्लाह तुला सृदृढ बाळ देवो.” दुसऱ्या एकाने लिहिलं, “मला वाटतं तुम्ही दोघंही लवकरच आई-बाबा होणार आहात.” तर आणखी एकाने लिहिलं, “तू आई होणार आहेस का? म्हणूनच हा उमराह तुझ्यासाठी खास आहे?” अशाप्रकारे अनेक युजर्सनी सनाला प्रश्न विचारले आहेत.

आणखी वाचा- झायरा वसिम ते सना खान, ‘या’ कलाकारांनी ठोकला चित्रपटसृष्टीला रामराम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
sana khan instagram

दरम्यान सना खान ‘बिग बॉस ९’मध्ये दिसली होती. या शोमध्ये तिला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर सनाने मोठ्या पडद्यावर स्वतःचं नशीब आजमावलं. तिने काही चित्रपटांमध्ये काम केलं. दरम्यानच्या काळात तिचं लव्ह लाइफही बरंच चर्चेत होतं. पण २०२० मध्ये तिचं आयुष्य बदललं. तिने ग्लमर सोडून स्वतःला धर्मासाठी समर्पित केलं. मात्र ती सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असते.