scorecardresearch

Premium

“अजय-काजोलच्या मुलीकडून ही अपेक्षा नव्हती…,” ‘त्या’ व्हायरल फोटोंमुळे नीसा देवगण ट्रोल

नीसाने तिच्या मित्रमंडळींबरोबर लंडनमध्ये बियॉन्सेच्या कॉन्सर्टला हजेरी लावली. परंतु या वेळेचा तिचा अंदाज नेटकऱ्यांना आवडला नाही.

nysaa

अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी नीसा देवगणने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वीच चर्चेत राहायला सुरुवात केली आहे. नीसा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असलेल्या स्टारकिड्सपैकी एक आहे. अनेकदा ती विविध पार्ट्यांमध्ये, कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असते. विविध कार्यक्रमांमधील किंवा पार्ट्यांमधील तिच्या व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. तर आता तिच्या नव्या फोटोंमुळे ती ट्रोल होत आहे.

नीसा अनेकदा तिचा मित्र ओरहान अवत्रमणीबरोबर पार्टी करताना दिसते. ओरहान एका व्यावसायिकाचा मुलगा आहे. ओरहान आणि नीसा एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रीण आहेत. अनेकदा ते एकत्र दिसतात. बऱ्याच पार्ट्यांमधील त्यांचे एकत्र फोटोदेखील चांगलेच व्हायरल होत असतात. तर आता त्या दोघांनी त्यांच्या इतर मित्रमंडळींबरोबर लंडनमध्ये बियॉन्सेच्या कॉन्सर्टला हजेरी लावली. या वेळेचे विविध फोटो ओरहानने सोशल मीडियावर शेअर होते.

Noida Police Shares Video Of python rescue
धावत्या ट्रकच्या केबिनमध्ये शिरला भलामोठा अजगर, पोलिसांच्या सतर्कतेमुळे बचावला ड्रायव्हर, थरारक VIDEO पाहाच
Mum loses unborn twin babies after pharmacy gives her abortion pills by mistake
औषध विक्रेत्याने चुकून दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, आईने तिच्या जुळ्या मुलांना गमावले
snehal shidam
“माझ्या वयाची मुलं लग्न करतात आणि मी…”, ‘चला हवा येऊ द्या’ फेम स्नेहल छिदमच्या पोस्टने वेधलं लक्ष
Delhi Metro viral video
चक्क धावत्या मेट्रोमध्ये आजोबांनी बिडी पेटवली अन्…, VIRAL व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया…

आणखी वाचा : Video: “आईला मान खाली घालायला लावली…” चारचौघात काजोलबरोबर केलेल्या ‘त्या’ वागणूकीमुळे न्यासा देवगणवर नेटकरी नाराज

सुप्रसिद्ध गायिका बियॉन्सेचा नुकताच लंडनमध्ये एक लाइव्ह कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टला नीसा आवर्जून उपस्थित होती. तर सध्या व्हायरल होत असणाऱ्या फोटोंमध्ये नीसा, ओरहान त्यांच्या इतर मित्रांबरोबर लंडनमध्ये बियॉन्सेचा कॉन्सर्ट एन्जॉय करताना दिसत आहेत. या फोटोमध्येदेखील नीसा तिच्या मित्रमंडळींना मिठी मारून पोच देताना दिसत आहे. परंतु तिचे हे व्हायरल फोटो आणि तिचा हा अंदाज नेटकऱ्यांना आवडला नाही.

हेही वाचा : “कायम नशेमध्ये…,” लंडनमधील ‘त्या’ व्हायरल फोटोंमुळे अजय देवगण-काजोलची लेक नीसा ट्रोल

या फोटोंवर एकाने कमेंट करत लिहिलं, “नीसा हे अजय देवगणचं ट्रान्सजेंडर व्हर्जन आहे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “अजय साळगावकरने त्याच्या मुलीला जरा जास्तच सूट दिली आहे.” तर आणखी एकाने लिहिलं, “या फोटोवर स्टिकर का लावला आहे! जर तिला काही दाखवायला लाज वाटत नाहीये तर तुम्हाला काय प्रॉब्लेम!” तर आणखी एक जण म्हणाला, “काजोल आणि अजयची मुलगी असं वागेल अशी कधीही अपेक्षा नव्हती. तिचा ड्रेसिंग सेन्स, तिचा मित्रपरिवार खूपच ओव्हर आहे. तिचा मित्र ओरी तर तिला नेहमी चिकटूनच असतो.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kajol and ajay devgan daughter nysa devgan gets troll for her recent photos rnv

First published on: 06-06-2023 at 12:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×