‘मिस्टर अँड मिसेस खन्ना, ‘क्योंकी, ‘बाजरंगी भाईजान’ आणि ‘बॉडीगार्ड’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली जोडी म्हणजे अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सलमान खान. या चित्रपटांतील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांनी चांगलीच एन्जॉय केली. शिवाय सलमानच्या ‘दबंग’ चित्रपटात करीनाने एक गाणंही केलं. मात्र एकत्र काम करूनही करीना सलमानची चाहती नाहीय आणि सलमान खूप वाईट अभिनेता असल्याचं तिने स्वत:च एका मुलाखतीत सांगितलं होतं.

खरंतर करीनाने सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान या बॉलीवूडच्या तिन्ही खानबरोबर काम केलं आहे. शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान हे गेल्या अनेक दशकांपासून इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत आणि त्यांच्या समकालीन अभिनेत्रींनीही त्यांचं अनेकदा कौतुक केलं आहे. तिघांबरोबर काम करणारी करीना कपूर तिच्या सुरुवातीच्या काळात शाहरुख खानची मोठी चाहती होती; पण तिला सलमान अजिबात आवडत नसे.

India.com ला दिलेल्या जुन्या मुलाखतीत, करीनाने तिला ‘सलमान आवडत नाही’ असं सांगितलं होतं. करीनाने बॉलीवूडच्या तिन्ही खानांबद्दल तिचे मत व्यक्त केलं होतं. यावेळी करीनाने सांगितलेलं की, “शाहरुख खान खूप आकर्षक आहे. मला तो खूप आवडतो. त्याच्याबद्दल मला विचारू नका. मी त्याच्याबद्दल सुरुवात केली तर तासन् तास बोलत बसेन. शाहरुखमध्ये काहीतरी अद्भुत आहे. त्याचा अभिनय मला कायमच भावतो.”

यानंतर जेव्हा करीनाला सलमान आणि आमिरबद्दल विचारण्यात आले होते तेव्हा ती म्हणालेली, “मी सलमानची अजिबात चाहती नाही. मला तो आवडत नाही, तो खूप वाईट अभिनेता आहे. मी त्याला नेहमी सांगते की, तो नेहमीच बकवास बोलतो. त्यापेक्षा आमिर चांगला आहे, मला तो ‘हम हैं राही प्यार के’ आणि ‘क्यूएसक्यूटी’मध्ये खूप आवडला होता, पण तिन्ही खानांमध्ये मी शाहरुखची खूप मोठी चाहती आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, करीना कपूरने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने बॉलीवूडचा एक काळ गाजवला आहे. करिअरमध्ये तिने अनेक यशस्वी आणि हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ती शेवटची अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात करीनासह अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, रवी किशन, जॅकी श्रॉफ आदी कलाकार होते.