करीना कपूर व सैफ अली खान बॉलीवूडचं लोकप्रिय कपल आहे. करीना आणि सैफ त्यांच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतात. त्यांची दोन्ही मुलं तैमूर आणि जहांगीर अनेकदा माध्यमांसमोर आले आहेत. करीना आणि सैफ सध्या त्यांच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहेत.

करीना कपूर व सैफ अली खान ही जोडी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर किस करताना दिसली. रविवारी या कपलला किस करताना पाहून पापाराझींनी हे क्षण कॅमेऱ्यात कैद केले. करीना आणि सैफचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हेही वाचा… ठरलं तर मग: सायलीच्या भावना दुखावल्याने कुसुम अर्जुनकडे मागणार ‘हे’ वचन; पाहा प्रोमो

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये करीना व सैफ त्यांच्या इमारतीतून बाहेर पडताना दिसले आणि गप्पा मारत मारत ते त्यांच्या कारकडे जात होते. नंतर करीनानं सैफचा हात पकडला आणि तो जाण्याच्या आधी त्याला किस केलं. या वेळेस करीनानं सफेद कुर्ता आणि निळी जीन्स घातली होती आणि केस तिनं वर बांधले होते. लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीनं काळ्या रंगाच्या सनग्लासेसची निवड केली होती; तर सैफ सफेद रंगाच्या कुर्त्यामध्ये आणि मॅचिंग पायजम्यात अगदी हॅण्डसम दिसत होता.

कपलच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओवर एकानं कमेंट करीत लिहिलं, “मला त्यांची जोडी खूप आवडते.” तर दुसऱ्यानं “लव्हबर्ड्स, रोमॅंटिक कपल” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा… “मी इतकी ढसाढसा रडले…”, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ शूटिंगच्या पहिल्याच दिवशी मृणाल दुसानीसला झालेले अश्रू अनावर, अभिनेत्री म्हणाली…

करीना व सैफनं पब्लिकली सगळ्यांसमोर अशा प्रकारे किस केल्यानं काही नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकादेखील केली आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट करत विचारलं, “पब्लिकमध्ये किस करणं गरजेचं आहे का?” “घरात यांना किस करायला वेळ मिळत नाही वाटत,” अशी कमेंट दुसऱ्यानं केली. तर एकानं लिहिलं, “यांना फक्त दिखावा करायचा आहे.”

करीना आणि सैफ २०१२ मध्ये लग्नबंधनात अडकले. यापूर्वी सैफचं लग्न अभिनेत्री अमृता सिंगबरोबर झालं होतं. २०२४ मध्ये दोघांनी वेगळं हाण्याचा निर्णय घेतला. सैफ व अमृता यांना सारा अली खान व इब्राहिम अली खान, अशी दोन मुलं आहेत. सैफ व करीना यांना तैमूर अली खान व जहांगीर अली खान, अशी दोन मुलं आहेत.

हेही वाचा… ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन; रंगभूमीवर घेतला अखेरचा श्वास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करीनाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या आगामी चित्रपटात करीना झळकणार आहे. तर, सैफ अली खान ज्युनियर एनटीआर व जान्हवी कपूरबरोबर तेलुगू चित्रपट ‘देवरा’मध्ये दिसणार आहे.