Malaika Arora Shares Her Fitness Secret: पडद्यावर दिसणारे कलाकार हे त्यांच्या आरोग्याची उत्तम पद्धतीने काळजी घेतात. तंदुरुस्त राहण्यासाठी ते स्वत:ची काळजी घेताना दिसतात. आपले आवडते कलाकारांची जीवनशैली कशी असते, त्यांची दिनचर्या काय असते, त्यांचे डाएट कसे असते, ते काय व्यायाम करतात हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
कलाकार अनेक मुलाखती, सोशल मिडिया या माध्यमातून हे कलाकार त्यांच्या व्यावसायिक तसेच खासगी आयुष्याबद्दल वक्तव्य करतात. फिट राहण्यासाठी ते काय करतात, कोणत्या पद्धतीचा व्यायाम करतात, जेवण करताना किती व काय खातात, याबद्दलही अनेक कलाकार खुलासा करतात. आता अभिनेत्री मलायका अरोराने एका मुलाखतीत तिच्या डाएटबद्दल वक्तव्य केले आहे.
त्यापेक्षी मी वाटीत अन्न घेऊन…
मलायका अरोराने नुकतीच लाइफस्टाइल, 32ND- इन्व्हेस्टमेंट अँड रेडिडेन्सेस या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, “माझा मुलगा खाण्यापूर्वी अन्न मोजून घेतो. पण, मी खाण्यापूर्वी अन्न मोजून घेत नाही. त्यापेक्षी मी वाटीत अन्न घेऊन खाण्याला प्राधान्य देते. ती वाटी एका विशिष्ट आकाराची असते. तितकेच अन्न मी खाते.”
पुढे अभिनेत्रीने तिच्या इंटरमिटंट फास्टिंगबद्दल सांगितले. इंटरमिटंट फास्टिंग(Intermittent Fasting) म्हणजे ठराविक वेळेत घेतला जाणारा आहार. डाएटिंगच्या या पद्धतीत दिवसातील २४ तासांपैकी १६ तास उपवास केला जातो. उरलेल्या ८ तासात अन्नपदार्थाचे सेवन केले जाते. मलायका म्हणाली, “मी इंटरमिटंट फास्टिंग करते. ही पद्धत माझ्यासाठी उपयुक्त ठरली आहे. माझी झोप चांगली होते. मी छान उठते. मला माझे शरीर जड वाटत नाही. मी हे आधी दररोज करत होते. आता मी इंटरमिटंट फास्टिंग एक दिवसाआड करते. १७ तास उपवास करते आणि उरलेल्या सात तासांत जेवण करते. मला जे खायचे असेल ते खाते. डाएटिंग आणि उपवास करण्यात फार फरक आहे. मी चीट डे आणि अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. मी खाते, पण मी त्या मर्यादित वेळेतच खाते. त्यानंतर मी खात नाही.”
मलायका असेही म्हणाली, “मी सूर्यास्तानंतर खात नाही. संध्याकाळी मी सात वाजता जेवते. त्यानंतर काहीही खाल्ले जाऊ नये, यासाठी प्रयत्न करते. मी लवकर उठते पण मी खात नाही. सकाळी मी तूप खाते. त्यानंतर १२ वाजता जेवण करते. मी जेवणात भात, भाजी, रोटी असं सगळं खाते. मी सर्वकाही खाते.”
वाढत्या वयात काळजी घ्यावी लागते, याबद्दल एका जुन्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणालेली, “एका विशिष्ट वयानंतर तुम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. आता मी ४९ वर्षांची आहे. लवकरच मी ५० वर्षांची होईन.” दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मलायकाने मुंबईत रेस्टॉरंट सुरू केले आहे.