Nana Patekar And Akshay Kumar Video: ‘हाऊसफुल’ या फ्रँचायजीचा ‘हाऊसफुल ५’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आहे. आता प्रमोशनच्या निमित्ताने हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
‘हाऊसफुल ५’ या चित्रपटात श्रेयस तळपदे, रितेश देशमुख, अक्षय कुमार, चंकी पांडे, नाना पाटेकर असे अनेक कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. या सगळ्यात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. नाना पाटेकर व अक्षय कुमार यांचा हा व्हिडीओ लक्षवेधी ठरत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये प्रमोशनदरम्यान, एका ठिकाणी नाना पाटेकर व अक्षय कुमार फुगडी खेळताना दिसत आहेत. अक्षय कुमार बाजूला उभ्या असलेल्या नाना पाटेकर यांना स्टेजवर आणतो. त्यानंतर ते फुगडी खेळताना दिसत आहेत. त्याच वेळी त्यांच्यामागील स्क्रीनवरील ‘हाऊसफुल ५’ चित्रपटातल्या दृश्यातदेखील ते फुगडी खेळत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर जॅकलीन फर्नांडिस, सौंदर्या शर्मा व इतर कलाकारदेखील फुगडी खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
‘हाऊसफुल ५’च्या टीझर व ट्रेलरमध्ये कलाकारांचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. तसेच, एक खून होत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काय ट्विस्ट येणार, नेमकं काय घडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. याआधी हाऊसफुल फ्रँचायजीचे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्या चारही चित्रपटांनी धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक चित्रपटाने प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन केले. त्यामुळे ‘हाऊसफुल ५’ची गोष्ट पाहण्यासही प्रेक्षक उत्सुक आहेत.
‘हाऊसफुल ५’मध्ये अभिषेक बच्चन , रितेश देशमुख, संजय दत्त, फरदीन खान, जॅकलिन फर्नांडिस, नर्गीस फाखरी, डिनो मोरिया, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, जॅकलिन फर्नांडिस हे कलाकार आहेत. तसेच, चित्रांगदा सिंग, सौंदर्या शर्मा, रणजित व आकाशदीप साबीर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
दरम्यान, हाऊसफुल ५ या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली असून, तरुण मनसुखानी यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट ६ जून २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. आता आधीच्या चार चित्रपटांप्रमाणे ‘हाऊसफुल‘च्या पाचव्या भागालादेखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.