२२ मार्चपासून आयपीएलच्या हंगामाला सुरूवात झाली आणि प्रत्येक टीमने आपली जोरदार खेळी दाखवली. रविवारी १४ एप्रिलला आयपीएलचे तगडे संघ एकमेकांसमोर आले होते. मुंबई इंडियन्स विरुदध चेन्नई सुपर किंग्ज्सचा सामना काल भारताने पाहिला. या अटीतटीच्या सामन्यात शेवटपर्यंत कोण बाजी मारेल याचा नेम काही लागत नव्हता. परंतु चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सवर २० धावांनी विजय मिळवला.

आयपीएल सामन्याला अनेक कलाकार उत्साहाने हजेरी लावतात. कालच्या सामन्याला नेहा धुपिया आणि तिचा पती अंगद बेदी, करिना कपूर खान तसेच जॉन अब्राहम यांनी हजेरी लावली होती. आज नेहाने तिच्या सोशल मीडियावर कालच्या सामन्याचे हायलाईट्स शेअर केले. यात नेहाने सामन्यातील काही फोटोज आणि व्हिडीओज शेअर केले आहेत. धोनीच्या सलग तीन षटकाराने सगळ्यांनाच अचंभित केलं पण नेहाचे हावभाव काही औरच होते. नेहा आवाक झाली होती. नेहाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

नेहाच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर नेटकर्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एवढ तोंड कोण खोलतं?” असं एका नेटकर्याने लिहिलं. ” धोनीने षटकार मारल्यावर जी रिअ‍ॅक्शन दिली ती खूप आवडली” असं दुसर्याने लिहिलं. “जॉन आणि करिनाने’ जिंदगी खल्लास’सारखा पोज दिलाय.” असं एकजण म्हणाला.

हेही वाचा… भूमी पेडणेकर व तिच्या बहिणीला ‘त्या’ व्हिडीओवरून नेटकऱ्याने केले ट्रोल; समीक्षा सडेतोड उत्तर देत म्हणाली, “एकच सर्जन की एकच पालक?”

“काल संध्याकाळच्या सामन्यातील माझे स्वतःचे हायलाइट्स! खेळ आवडला… ऊर्जा आवडली …आमच्या क्रू आवडला. ” असं कॅप्शन नेहाने या पोस्टला दिलं आहे.

हेही वाचा… ठरलं तर मग : सायलीने वनपीस विकत घेतल्याचं सत्य अस्मिताने आणलं सगळ्यांसमोर; पूर्णाआजी म्हणाली, “मला हे…”

दरम्यान, नेहा धुपिया ‘नो फिल्टर नेहा’ या पॉडकास्ट कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करते. ‘थेरपी शेरपी’ या वेब सीरिजमध्ये नेहा लवकरच झळकणार आहे.