बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांकाचा पती निक जोनास हा अमेरिकेतील प्रसिद्ध गायक आहे. निकचे मोठे भाऊ केविन आणि जो यांच्यासह ‘जोनास ब्रदर्स’ नावाचा त्यांचा बँड आहे, जो जगभरात प्रसिद्ध आहे.

निक जोनास व त्याचे भाऊ केविन जोनास आणि जो जोनास हे भारतात आले आहेत. मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवर शनिवारी त्यांचा भव्य संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा त्यांचा भारतातील पहिला संगीत कार्यक्रम होता. भारतात निक आणि जोनास ब्रदर्सचे प्रचंड चाहते आहेत. निक गाण्यासाठी स्टेजवर येताच जमलेल्या प्रेक्षकांनी ‘जीजू’ असे संबोधित निकचे स्वागत केले. किंग आणि निकच्या “तू मान मेरी जान” या कोलॅबरेटेड गाण्यावर प्रेक्षक मंत्रमुग्ध होताना दिसले.

जोनास ब्रदर्सचा भारतात पहिलाच कार्यक्रम असल्याने चाहते अतिउत्साही दिसत होते. शनिवारच्या या कार्यक्रमाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. यात जोनास ब्रदर्स त्यांच्या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेताना दिसले.

हेही वाचा… शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ आता पाहता येणार टीव्हीवर! कधी व कुठे? जाणून घ्या…

यातला मजेशीर भाग म्हणजे, जो आणि केविनने चाहत्यांना निकची ओळख ‘जीजू’ म्हणून करून दिली, त्यामुळे तिथे जमलेल्या प्रेक्षकांनी निकचा ‘जीजू’ ‘जीजू’ असा जयघोष करत स्वागत केले.

२०२३ ला रीलिज झालेल्या “‘तू मान मेरी जान’ x ‘आफ्टरलाईफ'” या गाण्यावर निक आणि किंगने एकत्र संगीत सादर केलं. कॉन्सर्टदरम्यान निक मजेशीररित्या प्रेक्षकांना म्हणाला, “भारतात परफॉर्म करण्याची आमची ही पहिलीच वेळ आहे. यात २०१८ मध्ये झालेल्या प्री वेडिंगमधला संगीत सोहळा ग्राह्य धरला जात नाही.”

भारतासाठी असलेल्या आपल्या भावना व्यक्त करत निक प्रेक्षकांना म्हणाला, “एक कुटुंब म्हणून आपलं या देशाशी घट्ट नातं आहे. तुमच्या या उत्साहपूर्ण स्वागतासाठी धन्यवाद. या संगीत कार्यक्रमासाठी तुमची उपस्थिती दर्शवल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. या कॉन्सर्टची ही रात्र नक्कीच रोमांचक असेल, याचं मी आश्वासन देतो.”

हेही वाचा… VIDEO: …अन् भर गर्दीत चाहतीने बॉबी देओलला केलं किस, ‘अशी’ होती अभिनेत्याची प्रतिक्रिया

या कॉन्सर्टसाठी प्रियांका चोप्रा निकसह भारतात येऊ शकली नाही. ‘माय हार्ट.. लव्ह यू मुंबई’ असे कॅप्शन देत प्रियांकाने कॉन्सर्टचा व्हिडिओ शेअर केला. कॉन्सर्टनंतर, जोनास ब्रदर्स नताशा पूनावालाच्या पार्टीमध्ये दिसले, जिथे सोनम कपूर, तिचा पती आनंद आहुजा आणि मलायका अरोरा या कलाकारांची उपस्थिती होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रियांका आणि निकबद्दल सांगायचं झालं तर २०१८ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले. त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये सरोगसीद्वारे त्यांच्या मुलीचं म्हणजेच मालती मेरीचं आगमन झालं.