बॉलीवूडचा बादशाह नेहमीच आपल्या अभिनयाने आणि चित्रपटांतील भूमिकांमुळे सतत चर्चेत असतो. शाहरुखचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. २०२३ चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ‘जवान’ ठरला. आता हा चित्रपट टेलिव्हिजन प्रीमियरसाठी सज्ज झाला आहे. तो कुठे, कधी आणि कसा पाहायला मिळणार जाणून घेऊया.

‘जवान’ पहिल्यांदाच आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. हा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘झी सिनेमा’वर आज म्हणजेच रविवारी, २८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता सगळ्यांच्या भेटीस येणार आहे.

Actor Ritesh Deshmukh believes that the amount of OTT is to some extent on the stress of financial success
आर्थिक यशाच्या ताणावर ‘ओटीटी’ची मात्रा काही प्रमाणात लागू; अभिनेता रितेश देशमुखचे मत
marathi actress Prajakta Gaikwad
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीला ‘मराठी’ची भुरळ, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणते, “ओटीटीच्या स्पर्धेत मराठी…”
Kalki 2898AD
‘कल्की : २८९८ एडी’चा जगभरात जलवा! प्रभासच्या चित्रपटाने केला हजार कोटींचा टप्पा पार
Director Sukathankar, audience,
आता रडकेपणाने मराठी चित्रपटांविषयी चर्चा करणार की… दिग्दर्शक सुकथनकर यांच्या प्रेक्षकांना कानपिचक्या
Shahrukh Khan
“शाहरुख खानने ‘कभी अलविदा ना कहना’मध्ये माझ्या भूमिकेची नक्कल केली”, पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा
Ranbir kapoor
‘या’ कारणामुळे रणबीर कपूरचे चित्रपट होतात ब्लॉकबस्टर; प्रसिद्ध दिग्दर्शकाकडून खुलासा
gaurav more write special post for satya movie
२६ वर्षांपूर्वीच्या बॉलीवूड चित्रपटासाठी गौरव मोरेची खास पोस्ट! शाहरुख-सलमान नव्हे तर ‘या’ अभिनेत्याने साकारलीये प्रमुख भूमिका
celebrity mehendi artist Veena Nagda
अंबानींचे प्री-वेडिंग ते बॉलीवूड चित्रपटांमध्ये मेहेंदी कलाकार म्हणून कोणाला आहे सर्वाधिक मागणी? जाणून घ्या…

हेही वाचा… VIDEO: …अन् भर गर्दीत चाहतीने बॉबी देओलला केलं किस, ‘अशी’ होती अभिनेत्याची प्रतिक्रिया

दक्षिणेतील आघाडीचा दिग्दर्शक ॲटली यानं किंग खानच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. शाहरुखसह ॲटलीचं हे पहिलं वहिलं कोलॅबरेशन होतं. ॲक्शन, ड्रामा आणि गाण्यांचं धमाकेदार पॅकेज असणारा हा चित्रपट आहे.

‘जवान’च्या टीव्ही प्रीमियरबद्दल बोलताना शाहरुख खान म्हणाला, “टेलिव्हिजनवर आपल्या चित्रपटाचा प्रीमियर पाहणे हा अनुभव नेहमीच सुंदर असतो. या चित्रपटासाठी आम्ही सगळ्यांनी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. झी सिनेमाच्या माध्यमातून हा चित्रपट देशभरातील घराघरांत पोहोचत आहे, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. ‘जवान’ हा तुमच्या आयुष्यातील एखाद्या प्रवासासारखा असेल. तो तुम्हाला विचार करायला लावेल, प्रेमात पडायला लावेल. ‘जवान’ तुम्हाला हसवेल, रडवेल; परंतु हा प्रवास तुमच्या कुटुंबासह अनुभवण्यासारखा नक्कीच असेल.”

हेही वाचा… “मी स्वतःला सिद्ध करून थकलेय,” असे का म्हणाली मराठमोळी मृणाल ठाकूर? जाणून घ्या…

ॲटलीनेही प्रीमियरबद्दल बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “चित्रपट निर्मातापूर्वी मी शाहरुख खानचा एक चाहता आहे. मी नेहमीच त्याच्या सर्व व्यक्तिरेखांच्या प्रेमात पडतो. ‘जवान’ ही एक प्रेमाची, संघर्षाची आणि भारतीय असण्याची भावना आहे. हा चित्रपट सर्वसामान्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे. झी सिनेमावरील ‘जवान’च्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरसाठी मी खूप उत्साहित आहे आणि भारतभरातील कुटुंबांपर्यंत हा चित्रपट पोहोचतोय याचा आनंद मला सर्वात जास्त आहे.”

हेही वाचा… आवडती अभिनेत्री कोण? विचारल्यावर अशोक सराफांनी घेतलेलं ‘या’ अभिनेत्याचं नाव, वाचा किस्सा

दरम्यान, या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटात शाहरुखसह अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत आहे. तर दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटामध्ये नकारात्मक भूमिका साकारत आहे. दीपिका पदुकोण या चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकत असून मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक हीसुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.