scorecardresearch

लॉजिकवरून ट्रोल करणाऱ्यांना ‘पठाण’च्या दिग्दर्शकाचे चोख उत्तर; ‘शोले’ चित्रपटाचं उदाहरण देत म्हणाले…

शोले चित्रपटाचं उदाहरण देत सिद्धार्थ आनंद यांनी मांडली वेगळी बाजू

siddharth anand about sholay
फोटो : सोशल मीडिया

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा गेले काही दिवस सातत्याने चर्चेत आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली. त्यानंतर आजवर या चित्रपटाने ६०० कोटीहून अधिक कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने इतिहास रचला आहे.

कोणत्याही मुलाखतीशिवाय केवळ ट्रेलर, गाणी आणि थेट चाहत्यांशी संवाद यांच्या माध्यमातून शाहरुख आणि ‘पठाण’ची टीमने या चित्रपटाचं प्रमोशन केलं. चित्रपटाच्या जबरदस्त कमाईनंतर यातील कलाकार आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी एकत्रित येऊन मीडियाशी संवाद साधला. नुकतंच ‘फिल्म कंपॅनीयन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ‘पठाण’बद्दल भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : तरुणीने शाहरुखकडे केली ‘व्हॅलेंटाईन डे’ला डेटवर येण्याची विनंती रोमान्स किंग म्हणाला “मी खूप…”

चित्रपटाला लॉजिकवरुन ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थने या मुलाखतीमध्ये उत्तर दिलं आहे. प्रत्येक गोष्ट लॉजिकच्या तराजूत तोलण्यात अर्थ नसतो असं सिद्धार्थ यांनी स्पष्ट मत मांडलं आहे. सिद्धार्थ म्हणाले, “आपण शोलेसारख्या महान चित्रपटाचं उदाहरण घेऊयात. हा चित्रपट पूर्णपणे गब्बर सिंगला पकडण्यावर बेतलेला आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्स दरम्यानच्या गाण्याचा नीट अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट जाणवते. त्या गाण्यात धर्मेंद्र याना बांधलं आहे, बसंती त्यांच्यासमोर नाचत आहे, गाणं संपल्यावर अमिताभ बच्चन येतात, धर्मेंद्र यांना सोडवतात, नंतर ते खिशात काडतूस आणि बंदूक घेऊन तिथून बसंतीला घेऊन पळ काढतात. बच्चनजी सुद्धा तिथून पळतात. संपूर्ण चित्रपट गब्बर सिंगला पकडण्याबद्दल आहे, पण शेवटी ते तिथून पळतात. अर्थात दिग्दर्शकाला जो क्लायमॅक्स दाखवायचा असतो, त्यासाठीचा हा खटाटोप असतो.”

पुढे सिद्धार्थ म्हणतात, “कथानकात कधी कधी लॉजिक पेक्षा नाट्य जास्त महत्त्वाचं असतं. आपल्याकडे खरंच चांगल्या अॅक्शन फिल्म्स बनत नाहीत, साऊथमध्ये असे चित्रपट जास्त बनतात हे मला मान्यच आहे. मी आजवर असे ३ चित्रपट केले आहेत, आणि प्रत्येक चित्रपटात मी प्रयत्न केले आहेत आणि त्यात सुधारणा करून प्रेक्षकांची फसवणूक होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष दिलं आहे.” तब्बल ४ वर्षांनी शाहरुख खानने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमबॅक केलं आहे. १० दिवसांत पठाणने ७०० कोटीहून अधिक कमाई केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 15:56 IST
ताज्या बातम्या