बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूनम पांडेचं सरव्हायकल कॅन्सरमुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) निधन झाल्याची माहिती शुक्रवारी (२ फेब्रुवारी ) तिच्या टीमकडून देण्यात आली होती. तिच्या मॅनेजरने यासंदर्भात सविस्तर इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. यानंतर अभिनेत्रीच्या निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. त्यामुळे एकंदरीत पूनमच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढत चाललं होतं. अखेर या २४ तास सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर पूनम पांडे जिवंत असल्याचं समोर आलं आहे.

पूनम पांडेने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. “मी जिवंत आहे, कर्करोगामुळे माझा मृत्यू झालेला नाही” असं तिने या व्हिडीओद्वारे स्पष्ट केलं आहे. याशिवाय यामध्ये तिने सर्वांची माफी मागितली आहे.

FM Nirmala Sitharaman
Budget 2024: प्रॉव्हिडंट फंडावरही कर! “आता जन्म, मृत्यू, लग्नावर टॅक्स लावायचा राहिलाय…” नेटकऱ्यांच्या मजेदार प्रतिक्रिया
Hardik Pandya- Natasha Stankovic Divorce
हार्दिक पंड्याने घटस्फोटावर केलं शिक्कामोर्तब; नताशा मुलाला घेऊन जाताच पोस्ट शेअर करत म्हणाला, “४ वर्षांनी अखेरीस..”
News About Mihir Shah
मिहीर शाह याची कबुली, “मी अनेकदा…”; पोलिस तपासात दिली माहिती
Lal krishna Advani Death Viral News
Fact check: लालकृष्ण अडवाणींच्या निधनाची पोस्ट व्हायरल; भाजपा नेत्यांनीही आधी वाहिली श्रद्धांजली मग कळलं सत्य
Anant Ambani Radhika Murchant Varun Grovar
“राजेशाही अराजकता निर्माण करते”, अनंत अंबानींच्या लग्नावरून लेखक वरूण ग्रोव्हर यांची जळजळीत टीका
Institute of Banking Personnel Selection has released the IBPS Clerk recruitment notification 2024 for CRP Clerks XIV Before 21 July
IBPS Clerk Recruitment 2024: तरुणांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! सहा हजार पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा, फी किती? जाणून घ्या सर्व माहिती!
rashmi thackeray tejas thackeray at ambani home
अंबानींच्या ‘बांधणी’ ट्रेंडमध्ये सुंदर पैठणी नेसून पोहोचल्या रश्मी ठाकरे, तेजस ठाकरेंचीही ‘मामेरू’ समारंभाला हजेरी, व्हिडीओ व्हायरल
Documentary For preservation of extinct aspects
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : नामशेष पैलूंच्या जतनासाठी…

हेही वाचा : “बोगद्यामध्ये १ तास अडकून…”, आदेश बांदेकरांनी सांगितला प्रवासादरम्यानचा अनुभव; म्हणाले, “एका चुकीमुळे…”

“मी जिवंत आहे…सुदैवाने सरव्हायकल कॅन्सरमुळे माझं निधन झालेलं नाही. पण, आज देशातील हजारो महिलांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. कित्येक महिलांना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. या गंभीर आजाराचा सामना कसा करायचा याबद्दल पुरेशी जनजागृती महिलावर्गात झालेली नाही. पण, तुम्हाला माहितीये का? सरव्हायकल कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी तुम्हाला वेळच्या वेळी आरोग्य तपासणी व HPV लसीकरण पूर्ण करणं आवश्यक आहे. आपण एकत्र मिळून या आजाराबाबत जनजागृती करुया. तुम्ही माझ्या वेबसाइटला जरुर भेट द्या. ही बातमी पैशांसाठी नव्हे तर जनजागृतीसाठी पसरवली” असं पूनम पांडेने तिच्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

दरम्यान, स्वत:च्या निधनाची खोटी माहिती शेअर केल्यामुळे सध्या पूनम पांडे विरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. तिच्या पोस्टवर कमेंट करत नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. याशिवाय मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी देखील पूनमच्या या पोस्टवर कमेंट्स करत घडल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.