मराठमोळ्या राधिका आपटेने बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. उत्तम अभिनयाबरोबरच राधिका तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. तिच्या सोशल मीडिया पोस्ट अनेकदा चर्चेत येतात. नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये राधिकाने तिला मुंबई विमानतळावर आलेल्या अनुभवाविषयी सांगितलं आहे.

राधिकाने तिच्या पोस्टमध्ये मुंबई विमानतळावरचे काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये उपस्थित नागरिक विमानतळावरील व्यवस्थेमुळे त्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेले काही तास अभिनेत्री विमानतळावर अडकली आहे. तिने या पोस्टद्वारे नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेऊयात…

हेही वाचा : “आवाज आत्यांसारखा नसल्याने टीका झाली,” लता मंगेशकरांची भाची राधा यांचा खुलासा; म्हणाल्या, “९ व्या वर्षी…”

विमानतळावरील गर्दीचे व त्रस्त प्रवाशांचे व्हिडीओ शेअर करत राधिका लिहिते, “अखेर मला ही गोष्ट पोस्ट करावी लागत आहे. आज सकाळी साडेआठ वाजता माझी फ्लाइट होती आता बरोबर १०.५० झाले आहेत. तरीही अद्याप फ्लाइटचा काहीच पत्ता नाही. फ्लाइट लवकरच येईल असं सांगून आम्हा सगळ्या प्रवाशांना एरोब्रिजमध्ये बसवलं आणि बाहेरून लॉक करण्यात आलं आहे. याठिकाणी काहीजण त्यांच्या लहान मुलांबरोबर प्रवास करत आहेत. वृद्ध प्रवासी, लहान मुलं सगळ्यांनाच गेल्या तासाभरापासून कोंडून ठेवलं आहे. सुरक्षारक्षक दरवाजे उघडण्यास तयार नाहीत. येथील कर्मचाऱ्यांना कशाचीही पूर्ण माहिती नाही. त्यांचे क्रू मेंबर्स आलेले नाहीत. शिफ्टमध्ये बदल झाल्याने ते अजूनही नवीन क्रूची वाट पाहत आहेत. आता नवीन क्रू केव्हा येईल? याची कोणालाही कल्पना नाही आणि आम्हाला असं किती काळ बंद करून ठेवणार याबाबतही काहीच माहिती नाही. बाहरेच्या एका मूर्ख कर्मचारी महिलेशी बोलण्यासाठी मी गेले. पण ती फक्त तुम्हाला काहीच अडचण येणार नाही एवढंच सांगत होती. १२ वाजेपर्यंत ना पाणी ना वॉशरुम काहीच सुविधा नाही! या सुंदर प्रवासासाठी खूप धन्यवाद!”

हेही वाचा : “तुमच्याबरोबर झोपले तर…”, श्रृती मराठेने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; म्हणाली, “मला घाम फुटला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राधिकाची पोस्ट पाहून मनोरंजनसृष्टीतील सुयश टिळक, अमृता सुभाष, मेहक ओबेरॉय, कोंकणा सेन शर्मा, सारंग साठ्ये, तिलोत्तमा शोम या कलाकारांनी कमेंट सेक्शनमध्ये संताप व्यक्त केला आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी मुंबई विमानतळाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राधिकाला पाठिंबा दिला आहे.