काही दिवसांपासून अभिनेता राजकुमार राव हा ‘स्त्री-२’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता यादरम्यान राजकुमार रावने एका मुलाखतीत, लोकांना वाटतं तितके आपण श्रीमंत नाही, असे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाला राजकुमार राव?

अभिनेता राजकुमार रावने नुकतीच ‘अनफिल्टर्ड बाय समदिश’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने म्हटले, “लोकांना वाटतं तितके पैसे माझ्याकडे नाहीत. लोकांना वाटतं माझ्याकडे १०० कोटी आहेत. घर घेतलं आहे, त्याचा ईएमआय भरावा लागतो. त्याची रक्कम मोठी आहे. असं नाही की पैसे नाहीत; पण इतकेसुद्धा नाहीत की खूप आहेत. उदाहरणार्थ, आज वाटलं की शोरूममध्ये जावं आणि सहा कोटी रुपयांची गाडी विकत घ्यावी, तर ते शक्य होत नाही.”

राजकुमारला रावला विचारण्यात आले की, जर सहा कोटींची गाडी घेऊ शकत नाही; पण तो ५० लाखांची गाडी विकत घेऊ शकतो का? त्यावर राजकुमार रावने म्हटले, “त्यावर परत चर्चा होईल की, घेऊ तर शकतो; पण घेऊ का? ५० लाखांची गाडी खरेदी करणे तणावपूर्ण वाटते. पण, मी सहज २० लाखांची कार खरेदी करू शकतो.” पुढे राजकुमार रावने म्हटले की, जेव्हा कलाकारांना एका रात्रीत जास्त पैसे मिळतात, त्यावेळी ते मला योग्य वाटत नाही. हे पैसे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम करतात.

राजकुमार रावच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याची प्रमुख भूमिका असलेला ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये तृप्ती डिमरी त्याच्याबरोबर प्रमुख भूमिकेत दिसत आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: Bigg Boss विजेत्या सूरज चव्हाणच्या नावाने लुबाडणूक; प्रकरण उघडकीस आल्यावर चाहत्यांना स्वत: केली विनंती, म्हणाला…

याबरोबरच याआधी प्रदर्शित झालेल्या स्त्री-२ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत सर्वांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत भारतात शाहरूख खानच्या जवान या चित्रपटालाही मागे टाकले आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरबरोबरच पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अक्षय कुमार, वरुण धवन, तमन्ना भाटिया हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राजकुमार राव लवकरच मालिक या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. हा चित्रपट पुलकित यांनी दिग्दर्शित केला आहे.