राखी सावंतच्या आईचं जेव्हा निधन झालं तेव्हा नेमकं काय घडलं? भावानेच केला खुलासा, म्हणाला, "त्या रात्री आईला..." | rakhi sawant brother rakesh sawant talk about his mother death and thanks to salman khan see details | Loksatta

राखी सावंतच्या आईचं जेव्हा निधन झालं तेव्हा नेमकं काय घडलं? भावानेच केला खुलासा, म्हणाला, “त्या रात्री आईला…”

आईच्या निधनानंतर राखी सावंतचा भाऊ राकेश सावंतचीही झाली बिकट अवस्था, सांगितलं निधनाच्या रात्री नेमकं काय घडलं?

Jaya Sawant died Rakhi Mother
आईच्या निधनानंतर राखी सावंतचा भाऊ राकेश सावंतचीही झाली बिकट अवस्था, सांगितलं निधनाच्या रात्री नेमकं काय घडलं?

अभिनेत्री राखी सावंतवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी (२८ जानेवारी) संध्याकाळच्या सुमारास राखीची आई जया यांचं निधन झालं. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमर या आजाराशी झुंज देत होत्या. रुग्णालयामध्ये जया यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. दरम्यान राखीच्या आईचं जेव्हा निधन झालं तेव्हा नेमकं काय घडलं याबाबत आता माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – Video : उर्फी जावेदचं ‘ते’ कृत्य कॅमेऱ्यात कैद, असा ड्रेस परिधान करत स्वतःच म्हणाली, “तो कोण आहे ज्याने…”

राखी सावंतचा भाऊ काय म्हणाला?

राखी तिच्या आईबरोबर अगदी शेवटपर्यंत होती. त्याचबरोबरीने राखीच भाऊही या कठीण प्रसंगांमध्ये तिच्याबरोबर होता. राखीचा भाऊ राकेश सावंतलाही आईच्या निधनानंतर दुःख अनावर झालं. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये राकेशने त्याच्या आईचं जेव्हा निधन झालं तेव्हा नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली आहे.

राकेश म्हणाला, “आजारामुळे माझी आई खूप त्रस्त होती. तिच्या किडनी, फुफ्फुसांपर्यंत कर्करोग पसरला होता. यामुळे शरीराचे इतर अवयवही निकामी झाले होते. ज्या दिवशी आईचं निधन झालं त्याच रात्री तिला हृदयविकाराचा झटका आला. राखी व मला आईचं दुःख बघवत नव्हतं.”

आणखी वाचा – “तिला नेहमी वाटायचं की…” आईच्या निधनानंतर राखी सावंतचा मोठा खुलासा

शिवाय राकेशने यावेळी सलमान खानचेही आभार मानले. राखीच्या आईच्या निधनानंतर सलमानने तिला फोन केला होता. शिवाय तिच्या आईच्या उपचारासाठी सलमानने आर्थिक मदतही केली. आईच्या निधनानंतर राखी पूर्णपणे कोलमडून गेली आहे. तिचे रडतानाचे बरेच व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 11:09 IST
Next Story
“टाइमपास…” वीरेंद्र सेहवागची शाहरुख खानच्या ‘पठाण’बद्दल खास पोस्ट चर्चेत