Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: देशातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानींचे छोटे सुपुत्र अनंत अंबानी यांचा प्री-वेडिंग सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. गुजरातमधील जामनगर येथे १ मार्चपासून सुरू झालेला अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा काल, ३ मार्चला संपला. त्यामुळे आता बॉलीवूड सेलिब्रिटींसह सर्व उपस्थित राहिलेले दिग्गज मंडळी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अनंत-राधिका यांच्या ३ दिवसांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात अनेक कार्यक्रम पार पडले. पहिल्या दिवशी जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहाना परफॉर्मन्स झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. बॉलीवूडच्या तीन खानने ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स केला. तर रणबीर कपूर-आलिया भट्ट आकाश अंबानी-श्लोका मेहतासह ‘केसरिया’ या गाण्यावर थिरकले. तिसऱ्या दिवशी, काल सर्व पाहुणे मंडळींना जामनगर व वनतारा फिरवलं आणि रात्री भव्य महाआरती झाली. यावेळी अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनी पार पडली. अशा प्रकारे अनंत-राधिका यांचा प्री-वेडिंग सोहळा धुमधडाक्यात झाला. आता पाहुणे परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट लेकीसह जामनगरहून मुंबईला रवाना झाले आहेत. याचे व्हिडीओ ‘फिल्मी ग्नान’ या एंटरटेन्मेंट इन्स्टाग्रामवर पेजवर शेअर करण्यात आले आहेत.

हेही वाचा – Video: अक्षय कुमारचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहून मुकेश अंबानींनी मारली मिठी, पाहा व्हिडीओ

या व्हिडीओत, रणबीर-आलिया आपल्या लेकीला घेऊन जामनगरहून निघाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी पुन्हा राहाच्या क्यूट अंदाजने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. नेव्ही ब्ल्यू रंगाच्या फ्रॉकमध्ये राहा खूप गोड दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

हेही वाचा – Video: ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेचा सुरू होणार नवा अध्याय, सुमीत पुसावळेच्या जागी बाळूमामांच्या रुपात झळकणार ‘हे’ अभिनेते

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, करिना कपूर, सैफी अली खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, जान्हवी कपूर, सोनम कपूर, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख, अर्जुन कपूर, सुहाना खान, नव्या नवेली नंदा, टायगर श्रॉफ, करिश्मा कपूर, राणी मुखर्जी, सोनाली बेंद्रे, नताशा पूनावालासह बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.