सलमान खान त्याच्या कॉन्सर्टनिमित्त पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होता. काल कॉन्सर्टपूर्वी त्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्या दोघांची भेट बॅनर्जी यांच्या कालिघाट येथील निवासस्थानी झाली. ममता बॅनर्जी यांनी सलमान खानचं दणक्यात स्वागत केलं. त्याचे व्हिडीओ आणि फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सलमान खानच्या ‘दबंग’ टूरचा कॉन्सर्ट काल कोलकाता येथील ईस्ट बंगाल क्लबच्या मैदानावर रंगला. त्यापूर्वी त्याने ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. सलमान आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : कोलकात्याला रंगणार सलमान खानचा दबंग कॉन्सर्ट, तिकिटाची किंमत वाचून व्हाल थक्क
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सलमानने त्याच्या गाडीमधून खाली उतरून ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेर तैनात असलेल्या मीडिया फोटोग्राफर्सना अभिवादन केले. या भेटीदरम्यान त्याच्याबरोबर त्याचा अंगरक्षक शेराही होता. फोटोग्राफर्सना अभिवादन करून तो ममता बॅनर्जी यांच्याकडे गेला. ममता बॅनर्जी यांनीदेखील त्याला शाल देऊन त्याचं स्वागत केलं. यानंतर त्या दोघांनी एकत्र फोटोग्राफर्सना पोजही दिल्या. ममता बॅनर्जी यांना भेटायला जाताना सलमान कॅज्युअल लूकमध्ये गेला होता. त्याने शर्ट आणि जीन्स परिधान केली होती.

हेही वाचा : सलमान खानचे राष्ट्रप्रेम, नौदलाच्या जवानांसाठी पोळ्या करतानाचे फोटो व्हायरल
सलमान खानबरोबरचे फोटो फेसबुकवर पोस्ट करत काल ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं हे सांगितलं. त्यांनी लिहिलं, “आज माझ्या निवासस्थानी प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांना भेटून आणि त्यांच्याशी संवाद साधून खूप आनंद झाला. या वेळी आम्ही सिनेसृष्टीसह कला, समाज आणि विकासापर्यंत अनेक विषयांवर चर्चा केली. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून त्यांनी भेटीसाठी वेळ काढल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्यांना उत्तम आरोग्य लाभो. ते यशाच्या पायऱ्या चढत राहोत हीच सदिच्छा.” ममता बॅनर्जी आणि सलमान खान यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आले आहेत.