बॉलीवूडचा ‘किंगखान’ म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे शाहरुख खान. आजवर त्याने त्याच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. शाहरुख अभिनयाबरोबरच त्याच्या फॅशनसाठीही तितकाच लोकप्रिय आहे. त्याच्या अभिनय आणि फॅशनचे जगभरात अनेक चाहते आहेत. अभिनेता सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो.

अशातच सोशल मीडियावर शाहरुखचा एका नव्या लूकमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि हा व्हिडीओ पाहून चाहते त्याच्यावर अगदी फिदाच झाले आहेत. शाहरुख नुकताच विमानतळावर डोळ्यांवर गॉगल आणि हातावर टॅटू असलेल्या एक नवीन स्टायलिश लूकमध्ये दिसला. त्याच्या या लूकमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या लूकने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे.

‘जवान’ आणि ‘पठाण’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर अनेक चाहते शाहरुखच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटासाठी जय्यत तयारी करत आहे आणि या नवीन लूकची छोटीशी झलक नुकतीच पाहायला मिळाली. डोळ्यांवर काळा गॉगल, डोक्यावर बिनी कॅप, उत्तम शरीरयष्टी आणि हातावर आकर्षक टॅटू असा शाहरुखचा नवीन लूक आहे.

शाहरुखचे नवीन लूकमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. “काय लूक आहे”, “किंग खान त्याच्या टॅटूच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे”, “आता किंग खान शाहरुखसाठी तयार राहा”, “इतिहास घडत आहे” अशा अनेक प्रतिक्रियांमधून चाहत्यांनी शाहरुखचा नवा लूक त्यांच्या पसंतीस पडल्याचं सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शाहरुख लवकरच ‘किंग’ या चित्रपटात दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. यात त्याची मुलगी सुहाना खानदेखील आहे. ‘द आर्चिज’नंतरचा तिचा हा दुसरा चित्रपट आहे. हा अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट असून यात अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता अभिषेक बच्चनदेखील मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे शाहरुखचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत.